ओशिवरा परिसरातील रिया पॅलेस या इमारतीला दहाव्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू

मुंबईतील ओशिवरा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली. या आगीमध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वृद्ध व्यक्ती आणि त्यांचा नोकर यांचा समावेश आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. दहाव्या मजल्यावर चंद्रप्रकाश आणि ममता सोनी हे वृद्ध राहत होते. त्यांचा नोकर बेलू पेटा अशा तिघांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. इमारतीमध्ये आणखी काहीजण अडकले असून त्यांना वाचविण्याचे काम सुरू आहे. ओशिवारा पोलिस अधिक तपास करत आहेत.