गुजरातमधल्या फटाका फॅक्ट्रीत भीषण आग लागून स्फोट

गुजरात येथील बनासकांठा येथे असलेल्या फटाका फॅक्ट्रीत मंगळवारी १ एप्रिलला भीषण आग लागली. या घटनेत १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.
सुरूवातीला फटाका फॅक्ट्रीला आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाले आणि आगीचा भडका उडाला. स्फोट इतके भीषण होते की छताचा भाग खाली कोसळला. त्या ढिगाऱ्याखालीही लोक अडकले आहेत. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून इतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.