देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगमध्ये लोकांचे जलसमाधी आंदोलन, दरम्यान घडला ‘असा’ प्रकार

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आतापर्यंत सातपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य तीन आरोपी अजूनही फरार आहेत. यामध्ये हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचाही समावेश आहे. सर्व आरोपींना पकडण्यात घटनेला तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही अपयश आल्याने पोलीस प्रशासनाला जागं करण्यासाठी आज मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून सोमवारी १ जानेवारीला जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका महिलेला चक्कर आल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आलं. तर आक्रमक झालेल्या गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे आंदोलनस्थळी पोहोचले होते.