समृद्धी महामार्ग अपघात- मृत व्यक्तींवर सामुहिक अंत्यसंस्कार

 समृद्धी महामार्ग अपघात- मृत व्यक्तींवर सामुहिक अंत्यसंस्कार

बुलढाणा,दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात २५ जणांचा मृत्यू झाला. बसला आग लागून प्रवाशांचा मृत्यू झाल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे अशक्य झाले आहे.सर्व मृतदेहांची DNA चाचणी करून ओळख पटवण्यात ५ दिवस लागणार आहेत. अशा मन विषण्ण करणाऱ्या स्थितीत सरकारने आणि मृतांच्या नातेवाईकांनी काळजावर दगड ठेवून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रविवारी (दि. १) सकाळीच सर्व मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

गिरीश महाजन यांनी म्हणाले की, “सगळ्या मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अनेक मृतदेह अर्धवट जळाले आहेत, कोणाचा चेहरा ओळखू येत नाही, अशी खूप वाईट परिस्थिती झाली आहे. मी सांगू शकत नाही इतक्या वाईट परिस्थितीत मृतदेह आहेत. सगळ्या नातेवाईकांनी हे मृतदेह बघितले आहेत. आता या मृतदेहांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे अशा सर्व ठिकाणांहून फॉरेन्सिक कर्मचाऱ्यांची पथकं बुलढाण्यात दाखल झाली आहेत. आम्ही मृतांच्या नातेवाईकांसमोर फॉरेन्सिक टीमला विचारलं की, मृतदेहांची ओळख पटवायला नेमका किती वेळ जाईल? त्यांनी सांगितले की, २४ तास काम केले तरी सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी किमान पाच दिवस तरी लागतील. सगळ्या मशिन्स वापरल्या तरी इतका वेळ लागेल. इतके दिवस हे सर्व मृतदेह जळालेल्या अवस्थेत तसेच ठेवून द्यावे लागतील. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, नातेवाईकही त्याला तयार आहेत, त्यानुसार या सर्व मृतदेहांवर सामूहिकरित्या अंत्यसंस्कार करण्यात येतील. आणखी काही नातेवाईक आल्यानंतर त्यांनाही आम्ही विचारू, तेही याला होकार देतील. त्यामुळे रविवारी सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास सगळेजण एकत्र येऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतील.”

दरम्यान या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या खाजगी बस विदर्भ ट्रॅव्हल्सच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यावर विविध कलमाने सिंदखेडराजा पोलीस स्टेशन मध्ये मोटर वाहन कायदा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SL/KA/SL

1 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *