मेरी कॉमने केली बॉक्सिंग मधून निवृत्तीची घोषणा
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन आणि 2012 ची ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कॉमने बुधवारी बॉक्सिंगमधून निवृत्तीची घोषणा केली. अजूनही मला उच्चस्तरावर बॉक्सिंग खेळण्याची इच्छा आहे, असं 41 वर्षीय मेरी कॉमने सांगितलं. पण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनच्या नियमानुसार अशी परवानगी मिळत नाही. त्यामुळे तिने रिटायर होण्याचा निर्णय घेतला. IBA च्या नियमानुसार, 40 आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या एथलीट्सना व्यावसायिक बॉक्सिंग टुर्नामेंटमध्ये खेळण्याची परवानगी नाहीय.
वर्ष 2018 मध्ये मणिपूर सरकारने असामान्य कामगिरीसाठी मेरी कॉमला ‘मीथोई लीमा’ पुरस्काराने सन्मानित केलं होतं. पद्म भूषण, पद्मश्री, अर्जुन पुरस्कार आणि अन्य काही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मेरी कॉमच्या जीवनावर आधारित ‘मेरी कॉम’ फिल्म 2014 मध्ये रिलीज झाली. यात प्रियांका चोप्राने मेरी कॉमची भूमिका निभावली होती.
Mary Kom announced her retirement from boxing
ML/KA/PGB
25 Jan 2024