महिंद्राच्या Thar ला टक्कर देणारी Maruti Suzuki ची कार

 महिंद्राच्या Thar ला टक्कर देणारी Maruti Suzuki ची कार

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मारूती सुझुकी या भारतात लोकप्रिय असलेल्या वाहन उत्पादक कंपनीने आता महिंद्राच्या बहुचर्चित Thar या कारला टक्कर देण्यासाठी नवीन जिमनी’ Jimny ही कार लाँच केली आहे.
मारुती सुझुकीने आपल्या बहुप्रतिक्षित ऑफ-रोडर ‘जिमनी’ Jimny च्या किमती जाहीर केल्या आहेत. मारूती सुझुकी कंपनीच्या म्हणण्यानुसार, जिमनीची सुरूवातीची किंमत १२. ७४ लाख रुपये असणार आहे. सुझुकी जिमनी आजपासून देशातील सर्व Nexa शोरूममध्ये डिलिव्हरीसाठी उपलब्ध असणार आहे.

जिमनी (5-डोअर) Zeta आणि Alpha प्रकारांमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. जिमनीच्या किंमतीची घोषणा करताना मारूती सुझुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हिसाशी टेकुची म्हणाले, ” भारतीय बाजारपेठेमध्ये साहसाचे प्रतीक असलेली क्लासिक जिमनी सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. सुझुकीच्या ALLGRIP PRO (4WD) टेक्नॉलॉजीद्वारे समर्थित असणारे वाहन १९७० पासून त्याच्या चांगल्या डिझाईन आणि ऑफ रोड क्षमतांसह स्टिरियोटाइप तोडत आहे. जिमनी लॉन्च करणे हा आमच्या SUV पोर्टफोलिओमधला एक महत्वाचा टप्पा आहे. देशातील सर्वात मोठी SUV उत्पादक कंपनी होण्याच्या प्रयत्नांमध्ये ती महत्वाची भूमिका बजावेल.” याबाबतचे Financial Express ने दिले आहे.

Jimny ची वैशिष्ट्य

मारूती सुझुकी जिमनी कारमध्ये १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. जे १०३ बीएचपी आणि १३४ टॉर्क जनरेट करते. जिमनीमध्ये लो-रेशो ट्रान्सफर केस आहे जे एसयूव्हीला ऑफ रोडींग करण्यासाठी मदत करते. जिमनीमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, पुश स्टार्ट किंवा स्टॉप बटण आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम असे फीचर्स देण्यात आले आहेत.

SL/KA/SL
8 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *