रविवार ७ डिसेंबर रोजी “खासदार क्रीडा महोत्सव-२०२५” अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धा

 रविवार ७ डिसेंबर रोजी “खासदार क्रीडा महोत्सव-२०२५” अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धा

मुंबई, दि २
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे जनतेला विविध खेळ प्रकारांबरोबरच मॅरेथॉनच्या माध्यमातून देशाचे उज्ज्वल भवितव्य असलेल्या युवापीढी व जनतेला निरोगी तसेच सुदृढ समाजाची जडण घडण करण्याच्या उद्देशाने २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी ७ डिसेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार लोकसभा क्षेत्रात ”खासदार क्रीडा महोत्सव-२०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचा भाग म्हणून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

हि मॅरेथॉन स्पर्धा २ किलो मीटर, ५ किलो मीटर व १० किलो मीटर अशी पार पडणार असून आरे चेक नाका, गोरेगाव (पूर्व) येथून स्पर्धेला सकाळी ६ वाजता सुरुवात होणार आहे. आरे चेक नाका-बिरसा मुंडा चौक-आरे चेक नाका असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र तसेच पदकाने गौरवण्यात येणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सुमारे २ हजारपेक्षा जास्त स्पर्धेक सहभागी होणार असून या सगळ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र तसेच पदक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत खासदार रविंद्र वायकर यांच्या समवेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *