माहिती तंत्रज्ञान(IT) समभागांमधील जोरदार तेजीमुळे बाजाराचा नवा विक्रमी उच्चांक

मुंबई, दि. 14 (जितेश सावंत) : १२ जानेवारी रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजाराने मागील आठवड्यातील तोटा पुसून टाकत नवा विक्रमी उच्चांक गाठला.टीसीएस आणि इन्फोसिसच्या निकालांमुळे माहिती तंत्रज्ञान (IT) समभागांमधील जोरदार रॅली,मजबूत जागतिक संकेत आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरीस दर कपातीची आशा या आशेवर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 12 जानेवारी रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 72,720.96 आणि 21,928.25 या नवीन विक्रमी उच्चांकांना स्पर्श केला.
शुक्रवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादनाच्या आकड्यावर सोमवारी बाजार प्रथम रिऍक्ट करेल. तसेच येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष यूएसए आणि चीनमधील डेटा, डॉलर इंडेक्समधील हालचाल, यूएस बाँडचे उत्पन्न ,कच्च्या तेलाच्या किमती,तिमाही निकाल, 15 जानेवारी रोजी जाहीर होणारे महागाईचे आकडे (WPI inflation),रेड सी वरील भू-राजकीय तणाव(Red sea crisis), तेलाच्या किमती (Oil Prices), विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची चाल(foreign institutional investors’ flow) याकडे राहील.
Technical view on nifty-.
शुक्रवारी निफ्टीने 21894.55 चा विक्रमी बंद भाव दिला.
येणाऱ्या आठवड्यात निफ्टी नवी विक्रमी स्तर गाठण्याची शक्यता अधिक आहे. निफ्टी साठी 21773 – 21715-
21688 हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी 21593 – 21564 – 21514 – 21500 हे स्तर गाठेल.हे स्तर तोडल्यास घसरण वाढेल.
गुंतवणूकदारानी घसरणीचा लाभ घ्यावा आणि चांगल्या समभागात गुंतवणूक करावी.
सेन्सेक्स 671अंकांनी घसरला
कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क प्रत्येकी एक टक्क्यांनी घसरले. जागतिक बाजारातील कमजोरी,
नफावसुली,तिमाही हंगामापूर्वी चिंता खास करून आयटी क्षेत्राकडून तसेच यूएस कडून जाहीर झालेला अपेक्षेपेक्षा चांगला नॉन-फार्म पेरोल डेटा आणि परिणामी यूएस 10-वर्षांच्या बॉण्ड यील्ड मध्ये झालेली वाढ यामुळे लवकर दर कपातीबद्दलचा कमी झालेला उत्साह या कारणांमुळे बाजरात घसरण वाढली. सेन्सेक्स ७०० अंकांनी गडगडला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 670.93 अंकांनी घसरून 71,355.22 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 197.80 अंकांची घट होऊन निफ्टीने 21,513 चा बंद दिला. Sensex tanks 671 pts
शेवटच्या तासात नफा वसुली
जागतिक बाजारातील मजबूत संकेतांमुळे जोरदार सुरुवात झालेल्या सत्राचा अंत शेवटच्या तासातील मोठ्या प्रमाणातील विक्रीमुळे मामुली बढत घेऊन झाला. दुपारपर्यंत बाजारात चांगली तेजी होती पण वरच्या स्तरावरून नफा वसुली झाल्याने बाजार घसरले. तिमाही निकालापूर्वीची अस्वस्थता बाजरात साफ जाणवत होती.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 30.99 अंकांनी वधारून 71,386.21 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 31.85 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 21,544.85 चा बंद दिला.Last hour selling wipes out morning gains
शेवटच्या तासातील खरेदीमुळे बाजाराची बढत
कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजाराने दिवसाची सुरुवात सपाटपणे केली आणि तिमाही निकाल तसेच इन्फ्लेशन डेटा यापूर्वी गुंतवणूकदारानी सावध भूमिका घेतली तथापि, शेवटच्या तासात झालेल्या हेवीवेट्स कंपन्यातील खरेदीमुळे बाजाराने स्मार्ट रिकव्हरी करून दिवसाचा उच्चांक गाठला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 271.50 अंकांनी वधारून 71,657.71 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 73.90 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 21,618.70 चा बंद दिला. Last-hour buying lifts market
किरकोळ वाढीसह बाजार बंद
सकारात्मक जागतिक संकेतांमुळे वरच्या स्तरावर नफावसुली सुरु असतानाही देखील बाजाराची सुरुवात उच्च पातळीवर झाली. दुपारपर्यंत बाजारातील तेजी टिकून होती परंतु दुपारनंतर, सत्राच्या उत्तरार्धात झालेल्या विक्रीने निर्देशांकात घसरण झाली.तथापि बाजार बंद होताना किरकोळ वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 63.47 अंकांनी वधारून 71,721.18 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 28.50 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 21,647.20 चा बंद दिला.Markets end high after volatile day
बाजाराने गाठला नवा विक्रमी टप्पा
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी बाजारात मोठी तेजी पाहावयास मिळाली बेंचमार्क निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला आणि मोठ्या प्रमाणावर आयटी समभागांनी या क्षेत्रातील दिग्गज Infosys आणि TCS यांच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या निकालांनी बाजाराला साथ दिली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 847.27 अंकांनी वधारून 72,568.45 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 247.30 अकांची वाढ होऊन निफ्टीने 21,894.50 चा बंद दिला.Market hits new milestone.
( लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत )
Markets hit new record highs on strong rally in Information Technology(IT) stocks
ML/KA/PGB
14 Jan 2024