मध्यपूर्वेतील संघर्षाच्या चिंतेमुळे बाजारात मोठी घसरण बाजार रिकव्हरीच्या प्रतीक्षेत
मुंबई, दि. 6 (जितेश सावंत) :
गेल्या संपूर्ण आठवड्यात बाजारात मोठ्या चढ-उतारांनी गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे.सलग पाच दिवस बाजारात घसरण झाली. मध्यपूर्वेतील संघर्षाच्या चिंतेसह परकीय गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री झाली, ज्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली. आर्थिक आघाडीवरही नकारात्मक बातम्या आल्या. HSBC India ने जाहीर केलेला मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) सप्टेंबर महिन्यात 56.5 वर घसरला आहे, जो ऑगस्टमध्ये 57.5 होता. हा आकडा जानेवारीपासून सर्वात कमकुवत आहे.
The market experienced significant fluctuations last week, with a continuous five-day decline due to concerns over the Middle East conflict and heavy selling by foreign investors, leading to volatility. Economic indicators like HSBC India’s Manufacturing PMI dropping to 56.5 in September and a widening current account deficit (CAD) of $9.8 billion in Q1 FY24-25 added pressure. Investors should watch key factors like the Iran-Israel conflict, oil prices, and foreign investor activity next week. The market is in an oversold zone, signaling a potential recovery, which long-term investors could capitalize on.
अर्थव्यवस्थेवर दबाव
याशिवाय, भारताची चालू खात्यातील तूट (CAD) आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत $9.8 अब्ज इतकी झाली आहे, जी GDP च्या 1.1% आहे. यामुळे आर्थिक स्थितीवर दबाव आला आहे. त्याच वेळी, भारतातील आठ प्रमुख क्षेत्रांचे उत्पादन (कोअर सेक्टर ग्रोथ) गेल्या 42 महिन्यांमध्ये प्रथमच ऑगस्ट महिन्यात 1.8% नी कमी झाले आहे, जे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक आव्हानात्मक चिन्ह आहे.
तसेच इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्जच्या नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे बाजारात नकारात्मक वातावरण,सतत परकीय निधी काढणे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा गुंतवणूकदारांच्या भावनेवर परिणाम झाला आहे.तसेच विदेशी गुंतवणूकदारांचा (FII) पैसा भारतातून चीनकडे जात आहे, ज्यामुळे लार्ज कॅप समभागांवर दबाव वाढत आहे. याशिवाय, राज्य निवडणुकांपूर्वी नफा-वसुली आणि चढ्या किमतींबद्दलची चिंता हे देखील बाजाराच्या घसरणीचे एक कारण आहे.
ह्या सगळया घटनांमुळे संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्स सुमारे 4.5% आणि निफ्टी 4.3% नी घसरले असून, जून 2022 नंतरच्या एका आठवड्यातील ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त बाजार बंद असल्यामुळे घसरण थोडी कमी झाली; अन्यथा ती आणखी मोठी होण्याची शक्यता होती.
पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष इराण -इस्राईल युद्ध ,कच्या तेलाचे भाव,अमेरिकन बाजार,विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका याकडे प्रामुख्याने राहील ,या वरून बाजाराची पुढील दिशा ठरेल.
गुंतवणूकदारांसाठी संधी, बाजार ओव्हरसोल्ड झोनमध्ये
शुक्रवारी अमेरिकन बाजार वधारला,Dow Jones +341.16 अंकांनी वाढला. भारतीय बाजार सध्या कमकुवत झाले आहेत पण ओव्हरसोल्ड झोन मध्ये आहेत एक छोटी रिकव्हरी जरूर येण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारानी या पडझडीच्या फायदा लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी उचलावा.
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 25014.06
Key Support Levels
24993-24950-24904-24,880-24845-24823.15,24,817-24,789-24,754-24736-24724-24717-24,686-24,631-24,619-24,587-24,530.9-24,502-25488-24,449-24,433-24,414-24367.5-24,331-24,281-24,240-24,193 Breaking these could lead Nifty to further lower levels.
Resistance Levels:
25031-25078–25152-25199-25235.9-25269-25303-25338-25356-25427-25470-25497-25528-25556-25688-25849-25951–26051-26111-26179-26200-26253-26277-26328 and 26379
These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
लेखक:
शेअरबाजार आणि सायबर कायदातज्ञ आहेत,
Author:
Expert in Stock Market and Cyber Law
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant