अर्थसंकल्पापूर्वी बाजारात 2% पेक्षा जास्त घसरण. अदानी समूहाच्या शेअर्स मध्ये जोरदार विक्री

 अर्थसंकल्पापूर्वी बाजारात 2% पेक्षा जास्त घसरण. अदानी समूहाच्या शेअर्स मध्ये जोरदार विक्री

मुंबई,दि. २८ (जितेश सावंत ) :  भारतीय बाजाराने 27 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात दोन आठवड्यांचा तेजीचा सिलसिला तोडला. सेन्सेक्स आणि निफ्टीने प्रत्येकी 2% घसरून एका महिन्यातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदवली.बँक निफ्टीत 5% पेक्षा जास्त घसरण झाली , ही 11 महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण ठरली. मिडकॅप निर्देशांक सलग चौथ्या आठवड्यात घसरला.निफ्टीच्या 50 पैकी 35 समभागानी तोटा नोंदवला. निफ्टी सेन्सेक्स ३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले.

आठवड्याच्या मजबूत सुरुवातीनंतर देखील बाजार गडगडला व त्याची प्रमुख कारणे ठरली, FIIs कडून सुरू असलेली विक्री. चांगल्या Q3 कमाईकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदारांची नफावसुली. पुढील आठवड्यातील यूएस FOMC बैठक,1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प व हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाच्या कंपन्यांवरील कर्जाबद्दल चिंता व्यक्त केल्याने सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात अदानी समूहाच्या शेअर्स मध्ये झालेली घसरण यामुळे बाजारात हाहाकार माजला.

1 तारखेला जाहीर होणारा अर्थसंकल्प हा देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी शेवटचा अर्थसंकल्प असल्याने गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सरकार पायाभूत सुविधांवर (infrastructure) अधिक खर्च करेल व त्यामुळे खाजगी क्षेत्रात (private sector) गुंतवणूक वाढेल असा गुंतवणूकदारांचा कयास आहे.

या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने ३१ जानेवारी रोजी जाहीर होणारे भारताचे fiscal deficit चे आकडे ,1 तारखेला जाहीर होणारा अर्थसंकल्प,(Finance Minister will present Budget 2023 on February 1)व अमेरिकेतील FOMC rate decision या कडे असेल.

Technical view on nifty-या आठवड्यात निफ्टीकरिता 17420-17400 हे स्तर राखणे जरुरी आहे अन्यथा निफ्टीत मोठी घसरण होऊ शकते.निफ्टी 17337-17287-17188-16957 हे स्तर गाठू शकते.वर जाण्याकरिता निफ्टीला 17723-17761-17774-17795-17956 हे स्तर पार करणे आवश्यक आहे.
बाजार मोठ्या प्रमाणात अस्थिर आहेत म्हणून गुंतवणूकदारानी अत्यंत सावधगिरीने पावले उचलावी तसेच संधीचा फायदा उचलून दीर्घकाळाकरिता चांगल्या समभागांची खरेदी करावी.

सेन्सेक्स ३१९ अंकांनी वधारला. Sensex gains 319 points
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उच्च पातळीवर उघडला आणि संपूर्ण सत्रात सकारात्मक राहिला दुपारनंतर काही नफावसुली झाली पण बाजार हिरव्या रंगातच बंद झाला. सलग दोन सत्र खाली राहिल्यानंतर ऑटो, तेल आणि वायू, माहिती तंत्रज्ञान (IT) आणि बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे बाजार वर गेला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 319 अंकांनी वधारून 60,941 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 90 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,118 चा बंद दिला.

बाजाराचा सपाट बंद. Market ends flat
सकारात्मक जागतिक संकेतांमुळे मंगळवारी बाजाराची सुरुवात चांगली झाली मागील सत्रातील तेजीला पुढे नेण्यात बाजार यशस्वी झाला. सत्राचा बहुतांश वेळ बाजार तेजीत राहिला.तथापि दुपारनंतर प्रॉफिट बुकींगमुळे सर्व इंट्राडे नफा मिटला गेला.व बाजार सपाट बंद झाला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 37 अंकांनी वधारून 60,978 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 0.20 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,118 चा बंद दिला.

सेन्सेक्स ७७३ अंकांनी गडगडला.Sensex tumbles 773 points
जानेवारी F&O एक्स्पायरीच्या दिवशी भारतीय बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. नकारात्मक सुरुवातीनंतर, दिवस जसजसा वाढत गेला तसतशी बाजारात विक्री वाढली, भारतीय बेंचमार्क निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरले. निर्देशांकांनी एका आठवड्याची नीचांकी पातळी गाठली आणि निफ्टीने इंट्राडे 17,900 चे उल्लंघन केले, परंतु दिवसाच्या नीचांकीवरून काही रिकव्हरी दिसली.केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी बाजार चिंताग्रस्त असल्याचे दिसून आले. बँकिंग शेअर्समध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकींग होताना दिसले बँक निफ्टीत 2.32 टक्क्यांची घसरण झाली.

अर्थसंकल्प आणि पुढील आठवड्यात अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी भीतीच्या वातावरणात देशांतर्गत शेअर बाजारात विक्री झाली. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची सतत विक्रीचा परिणाम देखील दिसून आला.तसेच शुक्रवारपासून T2 ते T1 सेटलमेंटमधील स्थलांतरामुळे काही ऑफलोडिंग झाले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 773 अंकांनी घसरून 60,205 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 226 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,892 चा बंद दिला.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाच्या कंपन्यांवरील कर्जाबद्दल चिंता व्यक्त केल्याने अदानी समूहाचे शेअर्स तब्बल १० टक्क्यांनी घसरले.

निफ्टी सेन्सेक्स ३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व फेब्रुवारी एक्सपायरी महिन्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात हाहाकार पाहावयास मिळाला. परदेशी गुंतवणूकदारांनी अदानी समूहाच्या कंपन्या आणि बँक आणि वित्तीय समभागांमध्ये जोरदार विक्री सुरू ठेवल्याने शुक्रवारी देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. सलग दुसऱ्या सत्रात बाजारात 1.5 टक्के पडझड झाली. फार्मा आणि ऑटो वगळता सर्व क्षेत्रांमध्ये विक्री दिसून आली. दिवसभरात सेन्सेक्स जवळपास १२०० अंकांनी गडगडला. शेवटच्या तासातील खरेदीमुळे बाजारातील तोटा कमी होण्यास मदत झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 874 अंकांनी घसरून 59,330 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 287अंकांची घट होऊन निफ्टीने 17,604 चा बंद दिला.

(लेखकशेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com

JS/KA/SL

28 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *