आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारात घसरण
जितेश सावंत, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय इक्विटी मार्केटने सलग तीन आठवड्यांपासूनचा वाढीचा सिलसिला तोडला.अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजारात 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.FII च्या गुंतवणुकीचे विक्रीत झालेले रूपांतर, भारतीय कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल,इन्फोसिसच्या कमकुवत निकालाने आयटी क्षेत्रातील शेअर्सची जोरदार विक्री आणि Fed द्वारे त्याच्या आगामी धोरण बैठकीतील संभाव्य दर वाढ यामुळे गेल्या आठवड्यात बाजारात घसरण वाढली. IT stocks worst hit
येणाऱ्या आठवड्यात बाजाराचे लक्ष तिमाही निकालांकडे राहील.इन्फोसिस आणि टीसीएसच्या निराशाजनक चौथ्या तिमाहीच्या निकालांमुळे बाजाराचे सेंटीमेंट खराब झाले आहे. काही मिडकॅप आयटी कंपन्यांचे तसेच बँकिंग सेक्टरचे निकाल चांगले लागतील अशी बाजाराची अपेक्षा आहे.
शुक्रवारी बाजाराचे कामकाज संपल्यानंतर भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चा निकाल जाहीर झाला. रिलायन्सला अपेक्षेपेक्षा मजबूत नफा झाला ऑइल, गॅस, केमिकल व्यवसायाच्या महसूलात चांगली कामगिरी केली. कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 19 टक्क्यांनी वाढून 19299 कोटी रुपये झाला.
Technical view on nifty- बाजार सध्या कमकुवत झाले आहेत. शुक्रवारी निफ्टीने 17624 चा बंद भाव दिला. निफ्टीने जर 17550 चा स्तर तोडला तर निफ्टी 17501-17443-17422-17402-17381-17359 हे स्तर गाठू शकते तसेच वर जाण्याकरिता निफ्टीला 17650 चा स्तर पार करावा लागेल त्यानंतर निफ्टी 17717-17748-17704 हे स्तर गाठेल.
आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे बाजार कोसळला.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सलग नऊ दिवसांच्या तेजीला जबरदस्त खीळ बसली.सेन्सेक्स, निफ्टी सकाळी मोठ्या घसरणीनेच उघडले आयटी क्षेत्रातील शेअर्सची जोरदार विक्री झाल्यामुळे सोमवारी देशातील शेअर बाजार कोसळले. इन्फोसिसच्या कमकुवत निकालाने बाजाराला निराश केले.इन्फोसिस च्या समभागात दिवसभरात जवळपास 15 टक्के घसरण झाली. सेन्सेक्समध्ये जवळपास 1000 अंकांची घट झाली. दिवसाअखेरपर्यंत सेन्सेक्स, निफ्टीत सुधारणा झाली.अमेरिकेत तिमाही निकालांचा हंगाम सुरू झाला आहे. दुसरीकडे चीनशी संबंधित अनेक डेटा येत आहेत त्यामुळे आशियाई शेअर बाजारातील गुंतवणूकदार सावध दृष्टिकोन स्वीकारताना दिसले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 520.25 अंकांनी घसरून 59,910.75 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 121.20 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,706.80 चा बंद दिला. Markets halt 9-day rally. Infosys slumps 9 percent
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण
संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी कमजोरी पाहावयास मिळाली.सुरुवातीचा नफा वगळता उर्वरित सत्रात बाजाराने घसरण नोंदवली. जागतिक संकेतांबद्दल बोलायचे झाले तर आशियाई बाजारात विक्री दिसून आली. पण सोमवारी अमेरिकेचे तिन्ही प्रमुख बाजार तेजीत बंद झाले होते.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 183.74 अंकांनी घसरून59,727.01वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 46.60 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,660.20 चा बंद दिला. Sensex, Nifty fall for 2nd day on profit taking in oil, banking stocks
सलग तिसऱ्या दिवशी घसरण सुरूच
कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात कमजोरीने झाली. जागतिक स्तरावर बिघडलेली रिस्क सेंटीमेंट आणि संभाव्य मंदीबद्दल गुंतवणूकदारांची वाढलेली चिंता यामुळे निफ्टीत तीन दिवसांपासून घसरण सुरूच राहिली.त्याचबरोबर इन्फोसिस आणि टीसीएसच्या निराशाजनक चौथ्या तिमाहीच्या निकालांमुळे देखिल बाजाराचे सेंटीमेंट खराब झाले.बुधवारी निफ्टीने आपली सायकॉलॉजिकल मार्क 17,600 च्या खालची पातळी गाठली परंतु शेवटच्या तासांच्या खरेदीमुळे निर्देशांकथोडा वर येण्यासाठी मदत झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 159.21 अंकांनी घसरून 59,567.80 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 41.40 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,618.80 चा बंद दिला. Benchmark indices NSE Nifty and BSE Sensex ended Wednesday’s volatile session in the red
तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक
कमजोर जागतिक संकेतानंतरही देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी खरेदी दिसून आली.सपाट सुरुवातीनंतर बाजरात काही प्रमाणात खरेदी झाली परंतु बाजार मोठ्या प्रमाणात बढत घेण्यात अयशस्वी ठरला.बाजार एका विशिष्ट पातळीभोवती फिरत राहिला.ऑटो, कॅपिटल गुड्स आणि पॉवर स्टॉक्सच्या पाठिंब्यामुळे बाजार वरती बंद झाला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 64.55 अंकांनी वधारून 59,632.35 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 5.7 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,624.50चा बंद दिला. Nifty and Sensex ended Thursday’s muted session flat
सेन्सेक्स निफ्टीचा सपाट बंद
कमजोर जागतिक संकेत असून देखील भारतीय बाजाराने शुक्रवारी बढत घेऊन सुरुवात केली.ही वाढ नंतर कमी झाली व बाजार सपाट राहिला दुपारनंतर बाजरात विक्री वाढली परंतु बाजाराने सपाट बंद होण्यात यश मिळवले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 22.71 अंकांनी वधारून 59,655.06 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 0.50 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,624.00 चा बंद दिला.
(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com