2024 च्या पहिल्या आठवड्यात बाजार किरकोळ घसरणीसह बंद

 2024 च्या पहिल्या आठवड्यात बाजार किरकोळ घसरणीसह बंद

मुंबई, दि. 6 (जितेश सावंत) : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक गाठल्यानंतरही बाजार किरकोळ नुकसानासह बंद झाला.05 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) इक्विटी मार्केटमध्ये 3,290.23 कोटी रुपयांची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) इक्विटी मार्केटमध्ये 7,296.50 कोटी रुपयांची विक्री केली.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने किरकोळ वाढ नोंदवली. 5 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात रुपया 83.16 वर बंद झाला.
शुक्रवारी भारत सरकारच्या अंदाजानुसार, NSO ने चालू आर्थिक वर्षात देशाचा GDP 7.3% वाढण्याची अपेक्षा आहे, असा पहिला आगाऊ अंदाज जारी केला.आर्थिक वर्ष 2023 मध्ये अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.2% होता.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष सुरू होणारे Q3 तिमाही निकाल तसेच 12 जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या भारताच्या IIP /CPI आकड्यांकडे राहील.त्याच दिवशी चीनचे CPI / PPI आकडे देखील जाहीर होणार आहेत.

Technical view on nifty-. शुक्रवारी निफ्टीने 21710.8 चा बंद भाव दिला.बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसतील.येणाऱ्या आठवड्यात निफ्टी साठी 21629-21564-21500,हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी 21482-21434-21365-21337 हे स्तर गाठेल वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 21770-21800-21834 हे स्तर रेसिस्टन्स (resistance) ठरतील.

बाजार विक्रमी उच्चांकावरून घसरला

अत्यंत अस्थिर सत्रात भारतीय इक्विटी निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सपाट बंद दिला. बाजार किरकोळ तोट्यासह उघडला आणि बहुतेक सत्रात नकारात्मक क्षेत्रात राहिला परंतु शेवटच्या तासातील खरेदीमुळे बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 यांना अनुक्रमे 72,561.91 आणि 21,834.35 या नवीन विक्रमी पातळीला स्पर्श करण्यात मदत झाली.तथापि वरच्या स्तरावर प्रॉफिट बुकिंगमुळे सर्व नफा पुसला गेला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 31.68 अंकांनी वधारून 72,271.94 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 10.50 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 21,741.90 चा बंद दिला. Market falls from record highs
सेन्सेक्स ३७९ अंकांनी घसरला.

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. भारतातील COVID-19 सब-व्हेरियंट JN.1 प्रकरणांमध्ये झालेली वाढ,4 जानेवारीला जाहीर होणारी FOMC मिनिटे,आठवड्याच्या उत्तरार्धात यूएस NFP आकडे तसेच कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि रेड सी मधील वाढता तणाव यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढणे पसंत केले.
सेन्सेक्स जवळपास 650 अंकांनी घसरला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 379.46 अंकांनी घसरून 71,892.48 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 76.10 अंकांची घट होऊन निफ्टीने 21,665.80 चा बंद दिला.

सेन्सेक्स 536 अंकांनी घसरला

सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजार विक्रीच्या दबावाखाली सापडला. दिवसअखेर जाहीर होणाऱ्या फेड मिनिट्स च्या अगोदर गुंतवणूकदार सावध होता त्याचप्रमाणे पुढील आठवड्यात सुरू होणारे तिसऱ्या तिमाही निकाला याचाही प्रभाव बाजारावर दिसला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 535.88 अंकांनी घसरून 71,356.60 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 148.50 अंकांची घट होऊन निफ्टीने 21,517.30 चा बंद दिला. Sensex falls 536 points

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ

दोन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी बाजाराने पुन्हा कमबॅक केले. कमकुवत जागतिक संकेत असूनही, बाजाराने सत्राची सुरुवात सकारात्मक नोटवर केली.बाजार बंद होताना दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ गेला आणि निफ्टीने 21,700 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.नवीन वर्षात शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू होती परंतु गुरुवारी त्याला ब्रेक लागला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 490.97 अंकांनी वधारून 71,847.57 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 141.30 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 21,658.60 चा बंद दिला.

Market bounces back
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी

आठवड्याच्या शेवटच्या सत्रात बाजारात खरेदीचा उत्साह दिसला.वर्षाच्या पहिल्या आठवड्याची समाप्ती आय.टी (information technology) क्षेत्रातील खरेदीमुळे सकारात्मकतेने झाली. परंतु दुपारच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी फार्मास्युटिकल आणि मेटल समभागांमध्ये नफा बुक केला. दरम्यान, जागतिक बाजारात कमजोर कल दिसून आला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 178.58 अंकांनी वधारून 72,026.15 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 52.20 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 21,710.80 चा बंद दिला. Market gains for the second day.

(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ आहेत)

jiteshsawant33@gmail.com

Market closes with minor decline in first week of 2024

ML/KA/PGB
6 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *