मराठवाडा संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम यांची निवड
छ संभाजीनगर , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठवाडा साहित्य परिषदेच्या गंगापूर येथे होत असलेल्या ४३ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परिषदेच्या कार्यकारिणीने कदम यांची एकमताने निवड केली.
कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, समीक्षा अशा सर्वच प्रकारांत कदम यांनी लेखन केले असून शासनाच्या पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
ML/KA/PGB 5 Aug 2023