मराठवाड्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका…

जालना, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसलाय. घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील एका शेतकऱ्याचे मका पीक जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आडवे झाले आहे. जिरडगाव येथील शेतकरी पंढरीनाथ गायकवाड यांनी आपल्या शेतात मका पिकाची लागवड केली होते. पंढरीनाथ यांनी आपल्या मका पिकाची योग्य निगा राखल्याने मक्याचे पीक ही चांगलं आलं होतं. मात्र, जिरडगाव येथे झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या मका पिकाला बसल्याने हे पीक आडवं झाले. त्यामुळे शेतकरी पंढरीनाथ गायकवाड हे संकटात सापडले असून नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केलीय.
ML/ML/PGB 2 April 2025