हा मराठी नेता आहे बिहार विजयाचा शिल्पकार
पाटना, दि. १४ : बिहारमध्ये आज NDA मिळाल्या प्रचंड यशामागे एका मराठी नेत्याचे कष्ट कारणीभूत ठरले आहेत. बिहार विधानसभा निवडणूकीत (Bihar Election Result) NDA ने एकतर्फी बाजी मारली आहे. एनडीएने 200 हून अधिक जागा मिळवल्या असून तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या महागठबंधनला फक्त 36 जागा मिळाल्या आहेत. पण या विजयाचा खरा शिल्पकार एक मराठी चेहरा ठरला आहे. बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी आखलेल्या रणनीतीमुळे तेजस्वी यादवांच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरलं, तसेच रणनीतीकार म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांचीही निराशा झाली आहे.
बिहारमध्ये यादव आणि मुस्लिम ही राष्ट्रीय जनता दलाची पारंपरिक व्होट बँक. पण यंदा ती भाजपकडे वळवण्यात यश आल्याचं दिसतंय. भाजपने यंदा त्या त्या ठिकाणच्या महत्त्वाच्या नेत्यांना तिकिटे देऊन ही व्होट बँक आपल्याकडे वळवली. त्यासाठी विनोद तावडेंनी आखलेले समीकरण उपयोगाला आल्याचं दिसत आहे.
एनडीएच्या यशामध्ये सर्वात महत्त्वाचं ठरलं ते म्हणजे काटेकोर नियोजन. एनडीएमधील पाच पक्षांमध्ये उत्तम समन्वय साधला गेला. ज्या मु्द्द्यांवरुन वाद होण्याची शक्यता आहे त्यावर चर्चा करून मार्ग काढण्यात आला. लोकसभेला एनडीएमध्ये जसा संवाद ठेवण्यात आता तसाच संवाद विधानसभा निवडणुकीतही ठेवण्यात आला. पाचही पक्षांमधील तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये आपण एकत्र लढतोय ही भावना बळावली.
भाजपने 120 जागा लढवल्या होत्या. पण सर्व 243 जागी भाजपचा उमेदवार उभा आहे असं समजून काम करण्यात आलं. त्यामुळे भाजपसोबतच एनडीएच्या सर्व पक्षांचे उमेदवार निवडून आल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं.
SL/ML/SL