मोठ्या प्रतिक्षेनंतर अभिजात मराठीचा शासन आदेश जारी

 मोठ्या प्रतिक्षेनंतर अभिजात मराठीचा शासन आदेश जारी

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑक्टोबर २०२४ मध्ये केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात दर्जा देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूका आणि सत्तापरिवर्तनाच्या गोंधळात याबाबतचा शासन आदेश काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने विरोधकांकडून मोठी टिका होत होती. या मोठ्या प्रतिक्षेनंतर आता मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, शासन आदेश न काढल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांनी यासंदर्भातला शासन आदेश जारी केला आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली.

मराठी भाषिकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता यामध्ये जे फायदे मिळत असतात त्यासाठी आम्ही 8 दिवसात प्रस्ताव सादर करणार आहोत. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन महाराष्ट्रसह आंतरराष्ट्रीय पातळीवर केले जाईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांच्या सरकारच्या मागणीमुळे हा दर्जा मिळाला आहे.

उदय सामंत, मंत्री, महाराष्ट्र

11 कोटी लोकांची बोलीभाषा असणारी मराठी ही जगातील 10 व्या ते 15 व्या क्रमांकाची भाषा आहे. याशिवाय देशातील ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचे अभिजातपण स्वयंसिद्ध आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार केंद्राने आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारी अधिसुचना काढली आहे.

एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटणे. भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.

भाषा भवन उभारणे, भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथलये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा इतर संस्थांमार्फत भाषेचा प्रसार देखील यातून करता येतो. विशेष म्हणजे भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्यासाठी व्यवस्था केली जाणार, प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार आहे. अभिजात दर्जा मिळाल्याने या भाषेतील विद्वान व्यक्तींना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना देखील करता येते.

SL/ML/SL

8 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *