मराठा आरक्षण आंदोलक अधिक हिंसक, नेते झाले टार्गेट…

 मराठा आरक्षण आंदोलक अधिक हिंसक, नेते झाले टार्गेट…

बीड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाची धग आता गावागावांमध्ये पोहोचली असून त्यात दोन आमदारांची घरे जाळण्यात आली, एका आमदाराचे कार्यालय फोडण्यात आले तर खुद्द मुख्यमंत्र्यानाच काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यात सकाळपासून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली. ही सुरुवात माजलगाव येथील  अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार  प्रकाश सोलुंके यांच्या बंगल्यावर दगड फेक करून बंगल्याला आग लावण्यात आली.या बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्याही फोडण्यात आल्या.त्यानंतर माजलगाव शहरातील नगरपंचायतीच्या कार्यालयालाही आगग लावण्यात आली.
सायंकाळच्या दरम्यान बीड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला आग लावण्यात आली.
त्यानंतर आंदोलकांनी नगर रोडवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावली. छ संभाजीनगर मध्ये भाजपा आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडण्यात आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यवतमाळ इथे काळे झेंडे दाखवण्यात आले.

दिवसभरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून जाळपोळीच्या घटना घडल्या.तसेच विविध गावातून शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये कोंडून कुलूप लावण्यात आले. बीड जिल्ह्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी समाज आक्रमक झालेला दिसत आहे.

दरम्यान गेवराई चे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी यवतमाळ इथे आले असताना त्यांना आंदोलकांनी काळे झेंडे दाखविले , पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याआधी मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले बॅनर ही आंदोलकांनी काळे फासून फाडून टाकले होते.

ML/KA/SL

30 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *