मराठा आरक्षण बैठक बहिष्कार , विधिमंडळात गदारोळ, कामकाज दिवसभर स्थगित

 मराठा आरक्षण बैठक बहिष्कार , विधिमंडळात गदारोळ, कामकाज दिवसभर स्थगित

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी काल सरकारने बोलावलेल्या बैठकीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कार घातला त्यामुळे आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राजकारण तापले . हाच मुद्दा कळीचा बनवत आज सत्तारूढ आघाडीने विरोधी पक्षाच्या नेत्यांना विधिमंडळात घेरले. सत्तारूढ सदस्य आक्रमक होत त्यांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला त्यातून कामकाज आधी चार वेळा आणि मग दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

आज सकाळी विशेष सत्र पार पडले, प्रश्नोत्तराचा तास ही झाला , त्यानंतर मात्र सत्तारूढ सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना टीकेचे लक्ष करीत काल कोणाच्या सांगण्यावरून मराठा आरक्षणावरची सर्वपक्षीय बैठक टाळली ते स्पष्ट करा , तुमचा बोलविता धनी कोण ते स्पष्ट करा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत तुमची भूमिका काय असे सवाल करीत घेरले.

एकाबाजूला सत्तारूढ सदस्य आक्रमक होऊन जागा सोडून पुढे गेले , त्यांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जमा होत घोषणाबाजी सुरू केली त्यातून प्रचंड गदारोळ झाला. दुसऱ्या बाजूला विरोधी सदस्य आपल्या जागेवर शेवटपर्यंत शांत बसून होते. त्यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. दोन वेळा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उठून आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र सत्तारूढ सदस्यांनी मोठ्याने ओरडत, घोषणा देत त्यांना बोलूच दिले नाही.

भाजपाच्या अमित साटम यांनी सभागृहात या विषयाला सुरूवात केली त्यावर आशिष शेलार, डॉ संजय कुटे , भरत गोगावले , नितेश राणे, राम कदम आदींनी आलटून पालटून सतत विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष केले. या गदारोळामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चार वेळा कामकाज तहकूब केले.

कामकाज पुन्हा सुरू होताच पुन्हा पुन्हा गदारोळ होतच राहिला. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९४,८८९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर केल्या , कोणत्याही चर्चे शिवाय गदारोळातच मागण्या मंजूर करण्यात आल्या. यातच विरोधी पक्ष काहीही न बोलता मराठा आरक्षण प्रश्नी अपमान करत आहेत, चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले देखील या प्रकरणी भूमिका घेत नाही, त्यामुळे आरक्षण नेमके कोणाला द्यायचं नाही हे जरांगे पाटील यांनी ओळखावं असे मंत्री विखे पाटील म्हणाले .

मंत्री शंभूराजे देसाई यांनी ही भूमिका मांडली. सर्व पक्षीय बैठकीचे निमंत्रण सर्व पक्षीय नेत्यांना प्रत्यक्ष निमंत्रण दिलं होतं, त्यांना फोन ही केलं होतं, सर्व पक्षीय लोकांचं मत जाणून घेऊन घेऊन पुढील निर्णय घ्यायचा आहे. मात्र आपली भूमिका मांडण्याचं विरोधक टाळत आहेत. विरोधी पक्षाच्या दुटप्पी भूमिकेची नोंद जरांगे पाटील यांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

दुसऱ्या बाजूला सत्तारूढ सदस्य घोषणाबाजी करत आहेत. विधान परिषदेत ही याच विषयावरून सत्तारूढ सदस्यांनी गदारोळ केला.
विधानसभेत कर विषयक कायदे सुधारणा विधेयक,
महाराष्ट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंध करण्यासाठी चे सुधारणा विधेयक, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध करणारे विधेयक आणि पुरवणी मागण्यांसाठी चे विनीयोजन अशी चार विधेयके मंजूर करण्यात आली. याच
गदारोळात पिठासीन अधिकारी संजय शिरसाट यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. Maratha reservation meeting boycott, commotion in the legislature, work suspended for the day

ML/ML/PGB
10 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *