मराठा आरक्षण , समितीला 63 निवेदने प्राप्त.

 मराठा आरक्षण , समितीला 63 निवेदने प्राप्त.

जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षणासाठी गठित केलेली समिती आज जालना दौऱ्यावर होती. या दौऱ्यात समितीला 63 निवेदने प्राप्त झाली असून यामध्ये काही पुरावे, दस्ताऐवज मराठा बांधवांनी समितीच्या सदस्यांकडे सुपूर्द केल्याची माहिती जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.

समितीच्या दौऱ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीची जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि त्यांची समिती आज जालना जिल्हा दौऱ्यावर आली होती.समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस मंत्रालयातील अधिकारी त्याचबरोबर विभागीय आयुक्त शिवाजी आरदड हे उपस्थित होते.विविध विभागाने तपासलेल्या नोंदी यापूर्वी समितीकडे देण्यात आल्या होत्या. Maratha Reservation, Committee received 63 representations.

या दौऱ्यात समितीला 63 निवेदन प्राप्त झालीत. यामध्ये निवेदन देणाऱ्यांनी काही पुरावे, दस्ताऐव देखील मराठा बांधवांनी या दरम्यान समिती समोर सादर केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी माध्यमांशी बोलतांना दिलीय.

ML/KA/PGB
12 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *