मराठा आंदोलकांचा पंकजा मुंडे यांना अडविण्याचा प्रयत्न

बीड, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील केज तालुक्यात पावनधाम येथे पंकजा मुंडे आल्या असता त्यांना मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुंडेची गाडी आडवण्याचा प्रयत्न केला होता .गाडी अडवण्याचा प्रयत्न होताच मराठा आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला होता. या आंदोलक कार्यकर्त्यांच्या विरुद्ध युसूफवडगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आहे आहेत.
केज तालुक्यातील औरंगपूर येथील तुकाराम पावनधाम येथे आज अखंड हरिनाम सप्ताह असल्याने भाजपा नेत्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी भेट दिली. यासाठी परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. पंकजा मुंडे या सप्ताह स्थळी येताच मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मराठा आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज करत गर्दीतून मुंडे यांची गाडी बाहेर काढून दिली. अचानक गोंधळ सुरू झाल्याने येथे धावपळ होऊन काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणात युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे पोलीस शिपाई योगेश समुद्रे यांच्या फिर्यादी वरून जवळबन येथील चोवीस जणांसह इतर २५ ते ३० अशा ५० ते ५५ जणांच्या जमावांनी जिल्हा दंडाधिकारी यांच्या महाराष्ट्र पोलिस कायदा जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचे गाडीचे समोर येऊन मराठा आरक्षणाच्या मागणीचे
संदर्भाने एक मराठा; लाख मराठा; आरक्षण आमच्या
हक्काचं नाही कुणाच्या बापाच ! अशा घोषणा दिल्या. गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि, जमावाने जिल्हा दंडाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन त्यांच्या विरुध्द गु र नं ७२/२०२४ भा दं वि ३४१, ३४३, १४७, १४९,१८८ महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Maratha protesters attempt to block Pankaja Munde
ML/ML/PGB
29 March 2024