सहा लाख रुपयांचं बक्षीस लागलेल्या माओवाद्याने केले आत्मसमर्पण

 सहा लाख रुपयांचं बक्षीस लागलेल्या माओवाद्याने केले आत्मसमर्पण

गडचिरोली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परिस्थितीच्या रेट्यामुळे हिंसाचाराकडे वळलेल्या माओवाद्यांना पुन्हा चांगले आयुष्य जगण्याची संधी देण्यासाठी सरकारने आत्मसमर्पण योजना जाहीर केली आहे. या योजनाचे लाभ घेत आजवर शेकडो माओवाद्यांनी हिंसक कारवाया सोडून सर्वसामान्य आयुष्य सुरु केले आहे. आज सहा लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी गणेश गट्टा पुनेम वय 35 वर्ष याने आत्मसमर्पण केलं आहे. गणेश गट्टा पुनेम, हा मूळचा छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील बेच्चापाल, भैरमगड येथील रहिवासी आहे. माओवादी गणेशने सीआरपीएफचे पोलीस उप-महानिरीक्षक जगदीश मीणा यांच्या समोर आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्यांनी त्याचे हस्तांतरण गडचिरोली पोलीस दलाकडे केलं आहे.

माओवादी दलामध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून, स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं जात नाही. दलामधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, माओवादी चळवळीकरीता पैसे गोळा करावे लागतात. पण, प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा वरिष्ठ माओवादी स्वत:साठीच वापरतात, जनतेच्या विकासासाठी कधीच पैसे वापरले जात नाही.
वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात. दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही.

गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांना आळा बसला आहे.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र आणि राज्य शासनाकडुन गणेश गट्टा पुनेम याला एकुण 5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकूण 14 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

SL/ML/SL
28 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *