मानवी साखळीतून अवतरले छत्रपती शिवराय …

परभणी, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जि प प्रशाला शाळेच्या मैदानावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मानवी साखळीद्वारे भव्यदिव्य अशी प्रतिकृती प्रशालेच्या प्रांगणात साकारण्यात आली. गावातील जि.प.प्रशाला ,केंद्रीय प्राथमिक शाळा,प्राथमिक ऊर्दू शाळा,कन्या शाळा, संत तुकाराम ऊर्दू माध्यमिक शाळा,स्कॉलर इंग्लिश स्कूल अंगणवाडी असे एकूण तब्बल ९९५ विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून साकारून अनोखी मानवंदना देण्यात आली. ही ९९९५ स्क्वेअर फुटातील कलाकृती तयार केली असल्याची माहिती रंगोळीकार ज्ञानेश्वर बर्वे यांनी दिली. मानवी साखळीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे चित्रीकरण ड्रोन कॅमेरा द्वारे करण्यात आले.
मानवी साखळीतून अवतरले छत्रपती शिवराय …
ML/ML/PGB 18 Feb 2025