पॅरिस ऑलिंपिकमध्ये मनू भाकर इतिहास रचण्याच्या तयारीत
पॅरिस, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑलिम्पिक २०२४ चा आज सातवा दिवस असून भारतीय खेळाडूंनी पात्रता फेरी गाठत पदक जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत भारताने तीन कांस्यपदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत मिळाली आहेत. आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण भारतीय खेळाडू विविध खेळांमध्ये खेळताना दिसणार आहत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकेरही आत परत खेळताना दिसणार आहे. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनकडून उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करणे अपेक्षित आहे.
तिरंदाजी मिश्र संघ स्पर्धेत भारताच्या धीरज-अंकिताने तिसरा सेट जिंकला पण पूर्वीचे दोन सेट गमावल्याने त्यांना फटका बसला होता. अखेरच्या सेटमध्ये ८,९,९,१० असे नेम साधत भारताने ३५ गुण मिळवले. तर अमेरिकेने १०,९,९,९ असे ३७ गुण मिळवत चौथ्या सेटमध्ये भारताचा पराभव केला. यासह त्यांनी ६-२ फरकाने सामना जिंकत कांस्य पदक जिंकले आहे.
तिरंदाजी मिश्र स्पर्धेत धीरज आणि अंकिताने पहिला सेट जिंकत चांगली सुरूवात केली पण कोरियाच्या जोडीने सलग तीन सेट जिंकत भारताचा उपांत्य फेरीत पराभव केला. चौथ्या सेटमध्ये भारताचे 37 गुण झाले तर कोरियाच्या खेळाडूने चांगला नेम साधत 38 गुणांसह सेट जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. पण भारताची जोडी कांस्य पदकाच्या फेरीत पोहोचली आहे.
आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेला हॉकी सामना हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखालील भारतीय हॉकी संघाने हा सामना जिंकला आहे. हा विजय भारतीय संघासाठी हॉकीमध्ये खूप महत्त्वाचा होता. टीम इंडिया हॉकीमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. हरमनचे दोन गोल आणि अभिषेकच्या एक गोलसह भारताने हा सामना ३-२ अशा फरकाने जिंकला. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोघेही ऑलिम्पिक २०२४ च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत, पण या विजयाने भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे.
भारताने ५२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. टीम इंडियाने १९७२ च्या ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव केला होता. यासह, भारतीय संघ सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाच्या शोधात मोठी कामगिरी करत आहे. आतापर्यंत त्यांना केवळ बेल्जियमविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. याशिवाय संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. भारताने ऑलिम्पिकमधील आपल्या मोहिमेला न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने सुरुवात केली. त्यानंतर भारताने अर्जेंटिनाविरुद्ध सामना अनिर्णित राहिला. शेवटपर्यंत अर्जेंटिना १-० ने पुढे होती. १.४५ मिनिट बाकी असताना कर्णधार हरमनप्रीतने गोल करत सामना बरोबरीत आणला.
काल बॅडमिंटनमध्ये भारताला जोरदार धक्के बसले. पीव्ही सिंधू आणि सात्त्विक-चिरागची जोडी पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
SL/ML/SL
2 August 2024