सिने निर्माता मनीष गुप्ताचा ड्रायव्हर वर खुनी हल्ला

 सिने निर्माता मनीष गुप्ताचा ड्रायव्हर वर खुनी हल्ला

मुंबई, दि 7

सुप्रसिद्ध सीने निर्माता मनीष गुप्ता यांनी काल सकाळी आपल्या ड्रायव्हर वर खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
श्री गुप्ता हे सरकार, सेक्शन थ्री सेवन फाईव्ह, रहस्य आणि वन फ्रायडे नाईट अशा लोकप्रिय चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 118 खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता यांनी चाकूने आपल्या ड्रायव्हर वर हल्ला केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. वर्सोवा पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात दिनांक 6 जून रोजी एफ आय आर दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सिने सृष्टीला धक्का बसला आहे.

सदर घटना काल शुक्रवारी सकाळी घडली. जखमी ड्रायव्हर चे नाव राज अल लष्कर असे आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मनीष गुप्ता यांना त्वरित अटक करावी अशी मागणी जोर धरत आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे दाखविण्यासाठी गुप्ता यांना अटक होणे गरजेचे असल्याचे अनेकांनी सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *