मनोज जरांगे पाटील यांनी माझी माफी मागावी नाहीतर अजून सत्य बाहेर काढणार !

 मनोज जरांगे पाटील यांनी माझी माफी मागावी नाहीतर अजून सत्य बाहेर काढणार !

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे पाटील यांनी माझ्यावर जे बिनबुडाचे व्यक्तिगत आरोप करत , शिवीगाळ ,धमकी , बलात्काराचे आरोप केले आहेत. त्याबाबत त्यांनी माफी मागावी नाहीतर अजून सत्य बाहेर काढणार असा इशारा अजय महाराज बारस्कर यांनी आज (सोमवारी )मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन दिला.

जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेत सातत्याने बदल करीत आहेत. त्यांचे काळे कारनामे मी लवकरच बाहेर काढणार आहे. जे काही सत्य आहे ते जनतेसमोर सांगणार. माझी नार्को टेस्ट करण्यास मी तयार आहे. त्यानेही तयार राहावे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक असल्याबाबत माझ्या बाबत बोलले जात आहे ते चुकीचे असल्याचे बारस्कर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मी सन २०१७ पासून मराठा आरक्षण प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वारंवार भेट घेऊन त्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करत होतो. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत जो काल झालेला प्रकार एका तमाशा प्रमाणे होता. जरांगे तीन कोटी लोकांचे नेतृत्व करतात मग कालच्या सभेला २०० कार्यकर्ते आले. त्यांचे नेतृत्व कमी होऊ लागले आहे असे अजय बारस्कर म्हणाले.

काही राजकीय पुढाऱ्यांनी जरांगे यांची नटसम्राट म्हणून टीका केली आहे. हा अपमान जरांगे यांचा नसून तो सर्व मराठा समाजाचा अपमान आहे. माझ्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपाबाबत बारस्कर म्हणाले , ती बलात्कार पीडित माय माऊली कुठे आहे ? तिला माझ्यासमोर आणावे व माझ्यावर गुन्हा दाखल करावा. मी बलात्कार केला आहे. असा आरोप जरांगे पाटील यांनी केल्यानंतर मी आत्महत्या करणार होतो. परंतु माझ्या गावातील वारकरी समाजाने त्या वक्तव्याचे खंडन केले . त्यामुळे आज मी जिवंत आहे. असे बारस्कर यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विचारधारा वेगळी आहे व माझी विचारधारा वेगळी आहे. प्रशासनाची इच्छाशक्ती असेल तर दोन दिवसांमध्ये आपल्याला कुणबी दाखले मिळू शकतात. मात्र तसे होताना दिसत नाही , मी २००६ पासून व्रत घेतले आहे ” मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून देणारच ” असे बारस्कर यांनी सांगितले.

मराठा आंदोलनकर्ते बबनराव वाळे यांच्या डोळ्यातील अश्रू सर्वांनीच पाहिले आहेत. जरांगे पाटील हे दुसऱ्याला काहीही करायला लावतात आणि स्वतः पळून जातात. म्हणून आता गर्दी कमी होऊ लागली आहे. मी शेवटचा श्वास असेपर्यंत खरेच सांगणार, जरांगे तू तोडणारा आहे, आम्ही जोडणारे आहोत. तू पेटवणार आहेस ,आम्ही विजवणारे आहोत. तू द्वेषाचा समर्थक आहेस आम्ही प्रेम देणारे आहोत. सर्व मराठा समाज हा या भूमिकेशी सहमत आहे. तू एका माणसाचा घात करीत नाही. तर संपूर्ण समाजाचा घात करत आहे असा आरोप बावस्कर यांनी केला.

माझ्यावर एवढी टीका जरांगे यांनी केली तेवढी टीका बीजेपी वर त्यांनी केली नाही. “यु आर चीटर” माझा व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा कोणताही सबंध नाही. बुद्धीच्या निकषावर भावनेच्या भरात वाहून जाऊ नकोस. मराठा समाज हा सरकारवर नाराज आहे आणि मी सुद्धा नाराज आहे असे बारस्कर म्हणाले. Manoj Jarange Patil should apologize to me or else the truth will come out!

ML/KA/PGB
26 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *