मनोज जरांगे पाटलांचे पाचवे आमरण उपोषण स्थगित…
जालना, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटी गावातील पाचवे आमरण उपोषण आज स्थगित झाले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज नारायण गडकर आणि अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हाताने ज्यूस पीत जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
आज जरांगे यांनी राज्य सरकारला 13 ऑगस्ट पर्यंत सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ वाढवून दिला. सरकारने 13 ऑगस्ट पर्यंत मराठा आरक्षण द्यावे नसता आम्ही विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचं जरांगे यांनी म्हटले. दरम्यान मनोज जरांगे आता उपोषण स्थगित करून छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयाकडे रवाना झाले.
ML/ML/SL
24 July 2024