मनोज जरांगे उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर…

 मनोज जरांगे उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर…

जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्या पुण्यात शिवनेरी येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन मनोज जरांगेंच्या राज्यभरातील दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांचे परवाच्या विराट सभेनंतर पुन्हा उद्या पासून दौरे,भेटीगाठी सुरू होणार असून हा गाठी भेटी दौरा आहे,ही सभा नसल्याची प्रतिक्रया जरांगे यांनी दिली आहे. आम्ही समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी बाहेर जातोय. हा दौरा ७ दिवसांचा असणार असून उद्या शिवनेरी येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरुवात होणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिलीय.

कोणाला विरोध करायचा म्हणून आम्ही जात नसून महाराष्ट्र या जनतेचा आहे, मराठ्यांचा आहे, सगळ्या धर्माचा असून कोणत्या पक्षाला विरोध करण्यासाठी मी खेडला जात नसून समाज बांधवांच्या गाठीभेटी घेण्यासाठी जात असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी उद्या खेड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या सभेच्या अनुषंगाने दिलीय. विरोधाला विरोध करण्यासाठी आम्ही जात नसून आमच्या समाजाचा प्रश्न सोडण्यासाठी आम्ही जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

मनोज जरांगे यांची विराट सभा होऊन आज ३ दिवस पूर्ण झाले असून या दरम्यान आमच्याशी कोणाचा बोलणं झालं नसून आम्ही ती अपेक्षा पण केली नाही कारण आम्ही त्यांना ४० दिवस त्रास न देण्याचं शब्द दिलाय त्यामुळे आम्ही त्यांना फोन केला नाही, ते त्यांच्या कामात असून आम्ही आमचा कामात आहेत,पण आम्ही ४० व्या दिवशी आरक्षण घेण्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया मनोज यांनी दिलीय.

४० दिवसांनंतर आंदोलन करावं लागेल असं मला वाटतं तर नाही, पण जर ४० दिवसांनंतर जर आंदोलन झालं तर ते सरकारला झेपणारे नसेल अशी आक्रमक प्रतिक्रिया जरांगे यांनी दिलीय. दरम्यान या गोष्टीची दखल केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी घ्यावी कारण सगळ्यात मोठा वर्ग हा मराठा समाज असल्याने त्यांना याविषयी गांभीर्याने दखल घ्यावी लागेल असं ही त्यांनी त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

परवाच्या विराट सभेनंतर मनोज जरांगे यांना असलेला प्रचंड पाठिंबा उभ्या महाराष्ट्राने पहिला असून २२ तारखेला ते पत्रकार परिषद घेऊन पुढची दिशा ठरवणार आहेत,तर २४ तारीख ही सरकारला दिलेली शेवटची तारीख असल्याने उभ्या महाराष्ट्राचं लक्ष आता अंतरवाली सराटी कडे लागून राहिलं आहे. Manoj Jarange on Maharashtra tour from tomorrow…

ML/KA/PGB
17 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *