मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला

जालना, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासंदर्भात सरकार ठोस भूमिका घेत नसल्यामुळे, आज अखेर सरकारला दिलेला इशारा जरांगे पाटील यांनी पूर्ण करत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सकाळी साडेदहा वाजता पत्रकार परिषद घेत पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
या दरम्यान सरकारने विशेष अधिवेशन बोलवून या सत्रामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा, आंदोलना दरम्यान आंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ परत घ्यावे अशा मागण्या केल्या आहेत.माझ्या उपोषणा दरम्यान मला राज्य मंत्रिमंडळातले सहा ते सात मंत्री भेटण्यासाठी आले असता माझे उपोषण ज्यावेळी त्यांनी सोडले त्यावेळी त्यांनी मला शब्द दिला होता की राज्यातील मराठा आंदोलनाच्या वेळी दाखल झालेले सर्व गुन्हे आम्ही तात्काळ मागे घेऊ पण अद्याप पर्यंत ते गुन्हे सुद्धा मागे घेण्यात आले नाही असे जरांगे यांनी यावेळी माध्यमांना सांगितले.
राज्यात ज्या 57 लाख नोंदी सापडले आहेत त्या मराठा बांधवांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र सरकारने द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान माझ्यावर सुद्धा दौऱ्यावर असताना साल्हेर किल्ल्यावर हल्ला करण्यात आला होता पण ती बातमी मी समोर येऊ दिली नाही पण आता शेवटी मला ते सांगावे लागत आहे . साल्हेर गड किल्ल्यावर मी दर्शनासाठी गेलो असता त्या ठिकाणी माझ्या गाडीवर ट्रक टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्या ठिकाणी उपस्थित पोलिसांनी त्या ठिकाणाहून संबंधितांना बाहेर काढले मग आम्ही सुद्धा सुरक्षा द्यावी अशी मागणी करायला पाहिजे होती पण आम्ही तशी केले नाही कारण आम्ही मर्द मराठे आहोत असे मत जरांगे पाटील यांनी आज आमरण उपोषण आदरणीय घेतलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान व्यक्त केले.
या आमरण उपोषण दरम्यान त्यांनी अन्नत्याग पाणी त्याग करीत औषध उपचार सुद्धा घेणार नसल्याचा इशारा सरकारला दिला आहे.दोन दिवसात विशेष अधिवेशन सरकारने घेऊन हा कायदा पारित करावा या मागणीसाठी हे आमरण उपोषण असल्याची माहिती जरंगे पाटील यांनी दिली आहे.
ML/KA/SL
10 Feb. 2024