मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा बंदची हाक
बीड दि २१…मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज २१ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे त्यामुळे बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील व्यवहार बंद करण्यात आले आहेत.
मागील चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता जिल्हा बंदची हाक दिली गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ केली जावी. हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करावे. अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावे. यासह इतर मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. याच उपोषणाला पाठिंबा दिला जाणार आहे. दरम्यान आजचा जिल्हा बंद शांततेत असणार असल्याचं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितले आहे.