मनोज जरांगे यांची आता शंभर एकरावर जंगी सभा

 मनोज जरांगे यांची आता शंभर एकरावर जंगी सभा

जालना, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आता एक विशाल सभा घ्यायचे जाहीर केले असून त्यासाठी १०० एकर जमिनीवर सभेची तयारी सुरू केली आहे.

३० सप्टेंबर पासून गावोगावी फिरून समाज बांधवांशी जरांगे संवाद साधणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला जरांगे यांनी ४० दिवसांचा वेळ दिला आहे. त्यापैकी १ महिना म्हणजे ३० दिवस १४ ऑक्टोबर रोजी पूर्ण होत आहेत.त्या पार्श्वभूमीवर आता पर्यंत सरकारने काय माहिती पुरवली,काय काम केले याची माहिती सकाळ मराठा समाजापर्यंत पोहचावी या उद्देशाने येत्या १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरंगे हे विशाल सभा घेणार आहेत.

जवळपास १०० एकरच्या जागेवर या सभेची तयारी सुरू असून येणाऱ्या समाज बांधवांनी बसण्याची जागा,गाड्यांची पार्किंग अशी सर्व व्यवस्था करण्यात आले असून आज मनोज जरांगे यांनी जागेची पाहणी देखील केली.या सभेची माहिती देण्यासाठी आज त्यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

माझ्या आणि मराठा समाजासाठी १४ तारखेची सभा अत्यंत महत्वाची असल्याचे मनोज यांनी सांगितले आहे.सरकार कडून काय माहिती मिळाली त्याचा आढावा घेण्यासाठी तसेच समाजासोबत संवाद साधण्यासाठी ३० सप्टेंबर पासून गावोगावी भेटी देत समाजाला प्रत्यक्ष भेटून संवाद साधणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.यावेळी नियोजित सभेच्या स्थळाची पाहणी देखील जरांगे यांनी केली.

दुष्काळामुळे पिकानी माना टाकलेल्या असल्याने शेत जमिनी रिकाम्या आहेत.
त्यावरच या सभेचे आयोजन करण्यात येत आहे. उपोषण सोडल्यापासून त्यांनी समाज जागृतीचे काम सुरू केले असून त्याचाच भाग म्हणून ही सभा असणार आहे.

ML/KA/PGB 27 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *