मनोज सौनिक नवे मुख्य सचिव, विधिमंडळात कोण
मुंबई , दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याच्या मुख्य सचिव पदी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र विधिमंडळाच्या सचिवपदी कोण हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे.येत्या तीस तारखेला राज्याचे विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव सेवानिवृत्त होत आहेत , त्यांना मुदतवाढ न देता त्यांची नियुक्ती राज्य मुख्य सेवा आयुक्तपदार करण्यात आली आहे, त्यांच्या जागी मनोज सौनिक यांना नेमण्यात आले आहे, याच जागेसाठी डॉ नीतीन करीर यांच्याही नावाची चर्चा होती , सौनिक यांना जेमतेम आठ ते दहा महिन्यांचा सेवा काळ मिळणार आहे.दुसरीकडे विधिमंडळाचे विद्यमान सचिव राजेंद्र भागवत हेही तीस तारखेला सेवा निवृत्त होत असून त्यांचा मुदतवाढ घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र यापूर्वी अशी मुदतवाढ कोणालाही देण्यात आलेली नाही, त्यामुळे भागवत निवृत्त झाले तर त्यांच्या जागी कोण हा प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे.विधिमंडळ सचिवालयात सध्या सर्वात ज्येष्ठ विलास आठवले आहेत मात्र ते सह सचिव आहेत , त्यांना प्रभारी सचिव म्हणून नेमले जाते की मंत्रालयातून तिथे नवीन सचिव आणले जातात ते पहायचे.
ML/KA/PGB 28 APR 2023