मनमाड मध्ये शिवजयंती साजरी

 मनमाड मध्ये शिवजयंती साजरी

नाशिक, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मनमाड येथे छत्रपती शिवरायांच्या भव्य स्मारकाचे अनावरण नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे आणि त्यांच्या पत्नी अंजुम कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायगडावरून आणलेल्या जलाने शिवप्रतिमेचे अभिषेक आणि पूजन करण्यात आले .छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. संध्याकाळी छत्रपती शिवरायांच्या कार्य कर्तृत्वाचे गुणगौरव करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुतळा अनावरण प्रसंगी भव्य रोषणाई आणि आतषबाजी करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिवप्रेमी प्रचंड उत्साहात मोठी गर्दी केली होती.

ML/KA/PGB 20 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *