मांजरा धरण ९८ टक्के क्षमतेने भरले…
लातूर दि २१:– लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण ९८ टक्के क्षमतेने भरले आहे. प्रकल्पाचे दोन दरवाजे आज सकाळी ०.२५ मीटरने उघडले. सद्यस्थितीत प्रकल्पाच्या चार दरवाज्यातून ३४९४.२८ क्युसेक्स इतका मांजरा नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प धरण ९८ टक्के क्षमतेने भरले आहे. प्रकल्पाची पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मांजरा प्रकल्पाचे दोन दरवाजे आज सकाळी आठच्या सुमारास ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत मांजरा प्रकल्पाचे चार दरवाजे ०.२५ मीटरने चालू असून, या चार दरवाज्यातून मांजरा नदी पात्रात ३४९४.२८ क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. मांजरा नदीपात्रात विसर्ग सुरू असल्यामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावातील नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. ML/ML/MS