वाराणसीतील अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला घाट बुलडोझरने उद्ध्वस्त
वाराणसी, दि.१६ : पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी उभारलेल्या वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरील बुलडोझर कारवाईमुळे ऐतिहासिक वारसा धोक्यात आला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने पुनर्विकास प्रकल्पाचा हवाला दिला असला तरी अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या घाटावरील मूर्ती व चबुतरे उद्ध्वस्त झाल्याने वाद निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून वाराणासीत पुनर्विकासाच्या नावावर महास्मशान मणिकर्णिका घाट इथं ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या ठिकाणी प्रशासनानं बुल्डोझर चालवत प्राणि चौथरा उद्ध्वस्त केला. चौथऱ्याला लागून असणाऱ्या देवी- देवतांसह पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यचा मूर्तीसुद्धा यादरम्यान क्षतिग्रस्त झाल्याची दृश्य समोर आली आणि सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली. मुख्य म्हणजे इथं महाराष्ट्रात एकिकडे मराठीच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष पेटलेला असतानाच तिथं उत्तर प्रदेशात मराठ्यांच्या इतिहासाला धक्का पोहोचला असल्याचंच या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, व्हिडीओ व्हायरल होताच इथं पाल समुदाराच्या अनेक नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलनास सुरुवात केली. ज्यानंतर पोलीस यंत्रणआंनी विरोधकांना अडवण्यासाठी कारवाई केली. येथील मूर्तींची पुनर्स्थापना पूर्ण आदरानं केली नाही, तर मोठं आंदोलन पुकारू असं आव्हानच यंत्रणांनी दिल्यानंतर प्रशासनानं त्यावर सारवासारव करणारी कारणं दिली. उपलब्ध माहितीनुसार वाराणासीमध्ये या ठिकाणी 25 कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ही वास्तू पाडण्यात आली.
सर्व मूर्ती व प्रतिमांचे संरक्षण व पुनर्स्थापन करण्याची मागणी स्थानिकाकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने मूर्ती सुरक्षित असल्याचा दावा केला, मात्र स्थानिकांना यावर विश्वास नाहीये. वाराणसी प्रशासनाने सांगितले की ही कारवाई काशी पुनर्विकास प्रकल्पाचा भाग आहे.
या घटनेमुळे विकास प्रकल्प आणि वारसा जतन यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. मणिकर्णिका घाट हा वाराणसीतील महाश्मशान म्हणून ओळखला जातो आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले घाट वाराणसीच्या इतिहास व परंपरेचे प्रतीक मानले जाते.
SL/ML/SL