रानमाळावर सेंद्रिय पद्धतीच्या माध्यमातून फुलवली आमराई..

 रानमाळावर सेंद्रिय पद्धतीच्या माध्यमातून फुलवली आमराई..

बुलडाणा दि ११ – कोकणचा हापूस आंबा अशी ओळख असलेल्या या हापूस आंब्याची लागवड रानमळावर करून बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पाण्याचे योग्य नियोजन करून सेंद्रीय पद्धतीने आमराई फुलवली आहे. पारंपरिक शेती परवडत नसल्याने काळाच्या गरजेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील प्रगतिशील शेतकरी सतीश गुप्त यांनी त्यांच्या पाच एकर खडकाळ शेत जमिनीवर आंब्याची लागवड करण्याचं ठरवलं आणि पाच वर्षापूर्वी त्यांनी सेंद्रिय पद्धतीने आंब्याच्या रोपांची लागवड केली.

यामध्ये 80 टक्के झाडे ही हापूस तर 20 टाक्यांमध्ये इतर जातीच्या आंब्यांचा समावेश आहे. पाच वर्षांनंतर त्यांच्या या मेहनतीला मूर्त स्वरूप आले आहे. या आठवड्यापासून त्यांना आंब्याचे उत्पन्न सुरू होणार आहे. आजपर्यंत त्यांना दहा लाख रुपये उत्पादन खर्च आलाय आणि यावर्षीपासून त्यांना चढत्या क्रमाने लाखोंचे उत्पन्न अपेक्षित आहे.

त्यांनी या बागेत विषमुक्त शेतीचा मंत्र जपला आहे, रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा देऊन केवळ शेणखत, गोमूत्र, गूळ, बेसन आणि जिवामृताचा वापर करून ही झाडे वाढवली आहेत. यामुळे या आंब्यांचा स्वाद, नैसर्गिक सुगंध आणि चव टिकून राहणार असून आरोग्याच्या दृष्टीने हे आंबे अत्यंत लाभदायी ठरणार आहेत. आमराईत हापूस आंब्यासोबतच केसर, तोतापुरी आणि नीलम अशा विविध आठ जातींच्या आंब्यांचे उत्पादन घेतले जात आहे.

डोंगराळ भागातील रानमाळावर असलेल्या गोद्री शिवारात असलेल्या त्यांच्या जमिनीत त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करत ठिबक सिंचनाद्वारे आंबा बागेला पाणी दिले त्यामुळे आंब्याची झाडे रानमाळावर जगलीत, पाण्याची बचत ही झाली त्यामुळे रानमाळावर हिरवीगार आंब्याची झाडे आज बहरली आहे .जंगल परिसरात असल्याने या आमराईतील झाडांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी नेट आणि इलेक्ट्रिक बल चा वापर केल्यामुळे तेथील रोही व इतर वन्य प्राण्यांचा वावर कमी झाला आहे या आमराई पासून त्यांना पुढील अनेक वर्ष आर्थिक उत्पन्न मिळणार आहे .

बुलढाणा जिल्हा हा बिजोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यात आंबा पिकासाठी पोषक वातावरण असल्याने बाराशे हेक्टर वर आधीच आंब्याची लागवड आहे आणि उत्पादनशील लागवड ही 546 हेक्टर आहे.. सतीश गुप्त या शेतकऱ्या प्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन फळबाग लागवड करावी आणि आपली आर्थिक उन्नती करावी असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास खडकाला देखील पाझर फुटतो हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल, इतर शेतकऱ्यांनी देखील कमी खर्चात नवनवीन प्रयोग केल्यास आपली आर्थिक उन्नती साधता येईल …

ML/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *