जागतिक बाजारात मंदीचे वारे, गुंतवणूकदारांचे लक्ष फेड बैठकीकडे

 जागतिक बाजारात मंदीचे वारे, गुंतवणूकदारांचे लक्ष फेड बैठकीकडे

मुंबई, दि. 7 (जितेश सावंत) :जागतिक बाजारातील अस्थिरता आणि अमेरिकेमध्ये पुन्हा निर्माण झालेली मंदीची भीती या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स ११०० अंकांपेक्षा जास्त गडगडला. गुंतवणूकदारांचे लक्ष संध्याकाळी जाहीर होणारया अमेरिकन जॉब डेटा वर होते. ज्याच्या थेट संबंध जगातील मोठ्याअर्थव्यवस्था मधील व्यजदार कपातीवर अवलंबून असल्याने गुंतवणूकदार सावध होते.
Global market volatility and renewed recession fears in the U.S. triggered significant declines in the Indian stock market. Sensex dropped by over 1,100 points on the last trading day of the week. Investors are focused on U.S. job data, which could influence rate cuts by global central banks. Nifty broke its three-week growth streak, and PSU banks led the decline. Concerns over credit growth and deposit data added to the market’s anxiety. The U.S. job report could push the Fed to cut rates by 25 basis points instead of 50.

निफ्टी आणि मिडकॅप इंडेक्सने त्यांच्या 3 आठवड्यांच्या वाढीचा सिलसिला तोडला.PSU बँक निर्देशांकात सर्वात मोठ्या प्रमाणात घसरण झाली.बँकिंग क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात घसरण झाली. कर्जावरील आगामी डेटा आणि ठेवींच्या वाढीबद्दलच्या चिंतेने बाजाराच्या चिंतेत भर टाकली . रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अलीकडील डेटामध्ये ठेवींमध्ये 11.7% वाढ आणि बँक क्रेडिटमध्ये 15% वाढ दिसून आली, ज्यामुळे दोघांमधील अंतर वाढले आणि संभाव्य लिक्विडीटीच्या समस्येबद्दल चिंता वाढली.

शुक्रवारी अमेरिकन बाजार देखील मोठ्या प्रमाणात गडगडले अपेक्षेपेक्षा कमकुवत यूएस नोकऱ्यांच्या वाढीमुळे वॉल स्ट्रीट घसरून बंद झाला. वॉल स्ट्रीटसाठी सुमारे 18 महिन्यांतील सर्वात वाईट आठवडा ठरला.कमकुवत डेटामुळे अर्थव्यवस्था मंद होत असल्याचे दर्शवले. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीकडे बाजारांचे लक्ष असताना हा अहवाल आला आहे. या डेटामुळे ५० बेसिस पॉइंट ऐवजी 25-बेसिस-पॉइंट कमी करण्याच्या शक्यता वाढल्या.

या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडी ,कच्च्या तेलाच्या किंमती,FII विक्रीचे प्रमाण यावर राहील . त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या मध्यभागी दर कपातीच्या अपेक्षेव्यतिरिक्त, सर्व डोळे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या यूएस निवडणुकांवर देखील आहेत. दोन्ही उमेदवारांनी अर्थव्यवस्थेसाठी त्यांचे संभाव्य धोरण जाहीर केले आहे. बाजार सध्या थोडासा कमकुवत दिसत असला तरी, गुंतवणूकदारांनी या घसरणीचा फायदा घेऊन दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करावा

Technical Analysis of Nifty:

Closing on Friday: Nifty closed at24852.15

Key Support Levels: 24845-24823.15,24,817-24,789-24,754-24736-24724-24717-24,686-24,631-24,619-24,587-24,530.9-24,502.24488-24,449-24,433-24,414-24,367.5-24,331-24,281-24,240- 24,193 Breaking these could lead Nifty to further lower levels.
Resistance Levels: -24858–24,880—24904-24950-24993-25031-25078-25101-25152-25199-25235.9 -25269-25303-25338–and -25357 These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
AuthorInformation:

लेखक ,शेअरबाजार आणि सायबर कायदा तज्ञआहेत.

ईमेल:
jiteshsawant33@gmail.com

X(ट्विटर):
@JiteshSawant

फेसबुक पेज:
Jitesh Sawant

JS/ML/PGB 7 SEP 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *