नागपूर जिल्ह्यात मंढई उत्सवाला सुरुवात

नागपूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हयात दिवाळी नंतर सुरू होतोय तो मंढई उत्सव, गावागावात मंढई उत्सव साजरा करण्यात येत असतो, दिवाळी नंतर शेतीची कामे कमी असतात. दिवाळीच्या सणात प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी येत असतो. अश्यात ग्रामीण भागात मनोरंजनाचे साधन कमी असल्यामुळे नागरिकांचे मनोरंजन व्हावे यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात खडी गंमत, खडा तमाशाचे आयोजन करण्यात येत असतात.
नागपुरातील सावनेर तालुक्यातील खापा येथे मंढई उत्सव निमित्य खडा तमाशाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मंढई उत्सव निमित्य परिवारातील सदस्य, मित्र मंडळी यांची भेट होत असते तसेच ग्रामीण भागात आणि शहरी भागात असणारे शाहीर यांना सुद्धा या मंढई उत्सव निमित्य आपली कला सादर करण्याची संधी मिळते. या माध्यामातून ते जनजागृती देखील हे मंडळ करीत असतात. नागरिकांचे देखील या माध्यामातून मनोरंजन होत असते.
ML/KA/SL
22 Nov. 2023