मंडणगड मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, दापोली हर्णे रस्ता खचला…

रत्नागिरी दि २६:– रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दापोली, मंडणगड तालुक्यात तर अक्षरश: पावसाचा कहर सुरू आहे. खेड तालुक्यात जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून खेड शहराला पुराचा धोका वाढला आहे. दुपारी बारा वाजता जगबुडी नदीची इशारा पातळी म्हणजेच सहा मीटर इतकी नोंदवली गेली आहे. मुसळधार पावसामुळे दापोली-हर्णे रस्ता खचला आहे. दापोली तालुक्यातील वणंद गावात नदीला आलेल्या पुरात 49 वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजेंद्र कोळंबे असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव असून दुपारी बारा वाजल्यापासून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात 211.25 मिमी इतका झाला आहे. ML.MS