प्रदूषण रोखण्यासाठी ‘पार्किंग’ व्यवस्थापन करा
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समन्वय समितीने मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील हवेच्या घसरत्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यासाठी महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमएमआरमधील महानगरपालिका आणि नगरपालिकांना पार्किंगच्या काटेकोर व्यवस्थापनासह निर्देश जारी केले आहेत. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 5 अन्वये अधिकृत केलेले हे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानुसार, अनुपालनाची जबाबदारी MPCB वर पडून, सर्व संबंधित प्राधिकरणांनी त्यांचे पालन केले पाहिजे.
सर्व पालिका प्रशासनांना हे निर्देश
-रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे ‘पार्किंग’वर काटेकोर देखरेख ठेवा
-सार्वजनिक परिवहनची वाहने वगळता रस्त्यांलगतची इतर वाहने हटवून रस्ते मोकळे करा
-खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करा आणि सर्व पदपथही अडथळेमुक्त करा
-बाजारपेठांमध्ये वाहतूककोंडी होऊ नये म्हणून जवळच पार्किंगसाठी विशिष्ट जागा उपलब्ध करा
-मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी होऊ नये म्हणून सार्वजनिक परिवहनच्या वाहनांना पार्किंगच्या जागा निश्चित करा
-सार्वजनिक परिवहनसाठी ‘महाराष्ट्र ई-व्हेईकल पॉलिसी-२०२१’ची कठोर अंमलबजावणी करा
-रस्ते सफाईसाठी तांत्रिक सुविधा वाढवा
-‘सखोल स्वच्छता’च्या माध्यमातून रस्त्यांलगतची धूळ नियंत्रित करा
-हवा प्रदूषणाचे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणांवर ‘लो-कॉस्ट सेन्सर्स’ची उभारणी करा
-हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून देखरेख ठेवण्यासाठी केंद्र व समिती स्थापन करा
-बांधकाम-तोडकामातील राडारोडा, कचऱ्याची विल्हेवाट केवळ ऑनलाइन यंत्रणेच्या साह्याने करा
-असा कचरा आच्छादित स्वरूपातच वाहून नेण्याचे बंधन संबंधित वाहनांना घाला
-कोळसा व लाकूड या इंधनावर अवलंबून असलेल्या उद्योगांना वर्षभरात ‘पीएनजी’वर वळवा
-वाहतूक सिग्नल व अन्य माध्यमांतून संपूर्ण ‘एमएमआर’मधील वाहतुकीचे नियमन सुरळीत करा
-बेकरी, तंदूर यांसारख्या उद्योगांना इलेक्ट्रिसिटीच्या स्वरूपातील इंधनाच्या वापरासाठी प्रोत्साहनात्मक धोरण आणा
-‘राष्ट्रीय स्वच्छ हवा धोरण’ या मंजूर कृती आराखड्याची कठोर अंमलबजावणी करा
वाहतूक पोलिस विभागाला निर्देश
-टॅसी व रिक्षा सेवा ई-वाहनांच्या माध्यमातून होण्याचे उपाय करा
-जुन्या रिक्षा व टॅक्सी रस्त्यांवरून हटवण्याचा कालबद्ध आराखडा तयार करा
-डिझेलवरील आठ वर्षे जुन्या वाहनांना मुंबईबाबत प्रवेशबंदी करा
-विशेष मोहिमेद्वारे ‘व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी-२०२२’ची कठोर अंमलबजावणी करा
‘एमएसआरडीसी’ला निर्देश
-‘एमएमआर’मधील सर्व टोलनाके ‘प्रगत फास्टॅग’च्या आधारे ‘एमटीएचएल’प्रमाणे अडथळाविना करा
Manage ‘parking’ to prevent pollution
PGB/ML/PGB
26 March 2024