मानवी अस्तित्वासाठी पर्यावरण संवर्धन हवे
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जागतिक तापमान वाढीसह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. मानवाकडूनच पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने अशा आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे मानवी अस्तित्व टिकविण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन गरजेचे आहे, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल बाबासाहेब पवार यांनी केले.येथील लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बॅंकेत हा कार्यक्रम झाला. माजी प्रांतपाल आण्णासाहेब गळतगे यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळत्या अध्यक्षा दिपाली पट्टणशेट्टी यांनी शाखेच्या कार्याचा आढावा घेतला. सचिव अहवाल सविता वडगुले यांनी तर उज्ज्वला मार्तंड यांनी खजिनदार अहवाल सादर केला. विनायक गळतगे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. लायन्सचे नवनियुक्त अध्यक्ष गुरूराज हत्ती, सचिव प्रतिक पाटील, खजिनदार विजय बुगडे व सहकाऱ्यांना पवार यांनी त्यांच्या पदाचे कर्तव्य, जबाबदारीची जाणीव करून देत पदग्रहण केले. अड. अभिजीत पाटील, श्रीकांत मोरे व नूतन सभासदांचा सत्कार झाला.
ML/ML/PGB 19 July 2024