मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी शेतकरी मुंबईच्या दिशेने…
बुलडाणा, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोयाबीनला आठ हजार रुपये तर कापसाला बारा हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, एकरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा , पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासमवेत शेतकरी बांधव मंत्रालयाचा ताबा घेण्याच्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील सोमठाणा या गावात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे, त्यांच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज ते मुंबईच्या दिशेने मंत्रालयाचा ताबा घेण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यां
समवेत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.त्यांच्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधव आणि महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.
ML/KA/PGB 28 Nov 2023