या कालावधीत मुंबईत मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या चित्रपट वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस MAMI आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईतील आयनॉक्स पीव्हीआर आणि रिगल या चित्रपटगृहांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यंदा या महोत्सवात जगभरातील पन्नासएक विविध भाषांमधील ११० हून अधिक चित्रपटांची पर्वणी सिनेरसिकांना अनुभवता येणार आहे.

महोत्सवातील विभागांमध्ये दक्षिण आशिया स्पर्धा, फोकस दक्षिण आशिया (स्पर्धाबाह्य), जागतिक सिनेमा, ट्रिब्युट्स, रिस्टोर्ड क्लासिक्स, गाला प्रीमियर्स, मास्टरक्लासेस, डायमेंशन मुंबई आणि रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स यांचा समावेश असणार आहे. तसेच यावर्षी २० पेक्षा जास्त वर्ल्ड प्रीमियर्स, २५ पेक्षा जास्त आशिया प्रीमियर्स आणि ३५ पेक्षा जास्त दक्षिण आशिया प्रीमियर्स होणार आहेत.

SL/ML/SL

14 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *