‘मामी’मध्ये ७० हून अधिक महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांची धूम

 ‘मामी’मध्ये ७० हून अधिक महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांची धूम

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जगभरातील सिनेप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मुंबई फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच ‘मामी’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात आयोजित करण्यात आलेल्या ‘मामी’मध्ये ७० हून अधिक महिला दिग्दर्शकांचे सिनेमे दाखवले जाणार हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. ‘Mami’ features more than 70 women directors’ films

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ‘मामी’च्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर, दिग्दर्शिका झोया अख्तर, फरहान अख्तर, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने, रोहन सिप्पी, अभिनेता राणा दगुबत्ती, अजय बिजली या सदस्यांसोबत महोत्सव संचालिका अनुपमा चोप्रा, सहसंचालिका मैत्रेयी दासगुप्ता, फेस्टिव्हलच्या इंटरनॅशनल प्रोगॅमिंग विभाग प्रमुख अनु रंगचर आदी मंडळी उपस्थित होती. दिग्दर्शक कबीर खान उशीरा पोहोचले. देशातील ७० हून अधिक भाषांमधील २५० हून अधिक सिनेमे, २० स्क्रिन्स, ८ कार्यक्रम स्थळे, अत्याधुनिक कला महोत्सव केंद्र आणि महिला दिग्दर्शकांच्या ७० हून अधिक चित्रपटांचा समावेश असणार आहे.

ML/KA/PGB
10 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *