कशेडी बोगद्याजवळ मालवणला जाणाऱ्या गणेशभक्तांच्या लक्झरी बसला भीषण आग

मुंबई, दि २४
मुंबईहून मालवणच्या दिशेने गणेशभक्तांना घेऊन जाणाऱ्या एका लक्झरी बसला रविवारी 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2:10 वाजता कशेडी बोगद्याच्या सुरुवातीस असणाऱ्या पुलावर अचानक आग लागली.गाडीचा टायर फुटल्याने ही आग लागली. या घटनेनंतर क्षणातच ज्वाळांनी संपूर्ण बसला वेढा घातला आणि आगीचा भडका उडाला. चालकाने प्रसंगसंवधानता राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस आणि खेड व महाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले असले तरी बस जळून खाक झाल्याने नागरिकांचे सर्व सामान देखिल जळून गेले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.KK/ML/MS