माळशिरसच्या निमगावात पारंपारिक वावडी महोत्सव…
सोलापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या मातीत लोप पावत असणारा मर्दानी वावडीचा खेळ आजही माळशिरस तालुक्यात जपला जातोय. माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव येथे निनाद पाटील यांनी 200 वर्षे जुनी परंपरा असणारा वावडी महोत्सव श्रावण महिन्यात आयोजित केला आहे. या महोत्सवात तीन फुटापासून 25 फुटापर्यंत असणाऱ्या वावड्या आकाशात झेपावताना दिसल्या. पारंपारिक आणि शेतकऱ्यांचा खेळ म्हणून वावडीच्या खेळाकडे पाहिले जाते.
वावडी म्हणजे एक प्रकारचा पतंग असतो. निमगावात झालेल्या वावडी महोत्सवात शेकडो वावड्या आकाशात घिरट्या घालत होत्या. विविध पक्षांच्या, नेत्यांच्या नावाने, आणि सामाजिक संदेश देणाऱ्या वावड्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. सध्या महाराष्ट्रात केवळ माळशिरस तालुक्यातच वावडी महोत्सवाचे आयोजन होत आहे.
ML/ML/PGB
12 Aug 2024