एमटी टेरा नोव्हा हे जहाज उलटले, मनिला उपसागरात तेलगळती

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमटी टेरा नोव्हा हे जहाज फिलिपिन्समधील इलोइलो शहराकडे जात असताना अचानक बदललेले हवामान आणि जोरदार वाऱ्यांसह अतिवृष्टी यांमुळे उलटले. ही गळती खूप दूरवर अनेक किलोमीटरपर्यंत पसरली आहे. मनिला उपसागरात तेलगळती झाली असल्यास, ती फिलिपिन्सच्या इतिहासातील सर्वांत मोठी दुर्घटना असेल; ज्यामुळे सागरी जीवन आणि किनारी परिसंस्था यांच्यावर त्याचा गंभीर परिणाम होईल.
१.४ दशलक्ष तेल वाहून नेणारे जहाज समुद्रात बुडाल्याने तैवान, फिलिपिन्स आणि आग्नेय चीनच्या काही भागांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे १.४ दशलक्ष लिटर तेलाने भरलेले एमटी टेरा नोव्हा हे तेलवाहू जहाज गुरुवारी (२५ जुलै) मनिला खाडीत बुडाले. या दुर्घटनेत एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला; परंतु १६ जणांना वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेनंतर पर्यावरणाबाबतही गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
PGB/ML/PGB
30 July 2024