मलिक नको मग पटेल कसे चालतात

नागपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दाऊद इब्राहिम च्या हस्तकांशी व्यवहार केल्याचा आरोप असणारे नवाब मलिक महायुतीत नको अशी भूमिका घेणाऱ्यांना मग असाच आरोप असणारे प्रफुल्ल पटेल कसे चालतात असा रोकडा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.
काल विधानसभा सभागृहात नवाब मलिक सत्तारूढ बाकांवर बसल्यानंतर ते महायुतीत नको अशी भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना थेट पत्रच पाठवले होते, त्यावर आज विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांना पत्र पाठवून काही रोकडे सवाल केले आहेत.
आपण नैतिकता आणि राष्ट्रवाद याबाबत पत्रात लिहिल्याने त्यावर आपण पक्के असल्याचे दिसून आले आहे, प्रफुल्ल पटेल यांनी ही दाऊद इब्राहिम च्या हस्तकांशी आर्थिक व्यवहार केल्याने ई डी नेच त्यांची मालमत्ता जप्त केली आहे असे दानवे यांनी या पत्रात म्हटले आहे. यासोबत पटेल नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटले आहेत, नवाब मलिक यांच्या बद्दल तुमच्या भावना तीव्र आहेत तर मग पटेल यांच्या बाबतही खुलासा करावा अशी मागणी दानवे यांनी या पत्रात केली आहे.
ML/KA/PGB 7 Dec 2023