माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

 माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह  पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिग्विजय काकडे यांच्यासह 22 सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांच्यासह उबाठा गटाचे दिग्रज विधानसभा संपर्कप्रमुख आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सभापती स्नेहल भाकरे यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

बारामती पश्चिम भागातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे 17 वर्ष संचालक असलेले सुरेश तुकाराम खलाटे, 23 वर्षे संचालक असलेले विलास देवकाते, तानाजी पौंदकुले, शेतकरी आंदोलनात सक्रिय असलेले अजित जगताप, ऍड अजित काशिनाथ जगताप, तात्या कोकरे, बिट्टुबाबा कोकरे यांचाही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला. शिवसेना बारामती लोकसभा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश संपन्न झाले.

याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबाराव राठोड, नेर तालुक्याचे उबाठा गटाचे तालुका संघटक अनिल चव्हाण, उबाठा गटाचे अल्पसंख्याक आघाडीचे विधानसभा प्रमुख शेख मुश्ताख तसेच नीतीन बोकडे, तेजस काळे, हरिश्चंद्र रुपवणे, विठ्ठल शिनगारे, यादव राठोड, दिनेश भोयर, प्रफुल्ल सोळंके असे स्थानिक पदाधिकारी आणि सरपंच यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

तर परभणी जिल्ह्यातील पाथरी नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. मुंजाजी ढाले पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब फुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा प्रचार प्रमुख ह भ प सारंगधर महाराज, सोनपेठ तालुक्याचे उबाठा गटाचे उप-जिल्हाप्रमुख मधुकर निरपणे यांच्यासह, पाथरी नगर परिषदेतील विश्वनाथ भाले पाटील, किरण भाले पाटील आणि हनिफ कुरेशी हे तीन नगरसेवक आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना, राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे सरकार आहे. सत्तेमध्ये आल्यापासून घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी घेतला आहे. राज्यातील लोकांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा योजना, मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना आशा योजना सुरू केल्या आहेत. याचा लाभ आपल्या भागातील जास्तीत जास्त लोकाना कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

मराठवाडा जलसमृद्ध व्हावा यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीडला मंजुरी दिलेली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये केंद्र आणि राज्य मिळून 12 हजार रुपये आम्ही दिले, 1 रुपयात पीकविमा देणारे पहिले राज्य आपले आहे, एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत आपण दिली, सततच्या पावसामुळे होणारे नुकसानाला मदत देऊ केली. गायीच्या दुधाच्या दरात 5 रुपये वाढवून दिले असे अनेक निर्णय या सरकारने घेतले. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नेरेटीव्ह पसरवून आपला डाव साधला मात्र यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना अधिक सजग राहून काम करावे असे आवाहन सर्वांना केले. आपल्या विभागातील प्रलंबित प्रश्न सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री संजय राठोड, शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सईद शेख, हेदेखील उपस्थित होते.

SW/ML/SL

25 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *