मालदिवने मानले भारताचे आभार

 मालदिवने मानले भारताचे आभार

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्षानुवर्षे भारताच्या मित्र यादीत राहीलेला हिंदी महासागरातील मालदिव देश गत काही दिवसांपासून चीनच्या नादी लागून भारतावर कुरघोडी करू पाहत होता. मालदीवमधील चीनच्या वाढत्या प्रभावामुळे भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडले होते काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कराचे अस्तित्व देखील सहन न करणाऱ्या मालदिवला आज भारताचे आभार मानावे लागले आहेत. कारण मालदिवला अत्यावश्यक वस्तूंची निर्यात करण्यास भारत सरकारने परवानगी दिली आहे. यावरून मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी आज भारत सरकारचे आभार मानले आहेत. तसेच भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जमीर यांनी आभार मानले.

जमीर म्हणाले, ‘मालदीवला कोटा अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंच्या निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल भारताचे ‘मनापासून आभार”. ‘दोन देशातील आंतरराष्ट्रीय संबंध बिघडले असून भारताने हा निर्णय घेणे म्हणजे ‘दीर्घकालीन मैत्रीचे प्रतीक आहे’. तसेच ‘मालदीवच्या विनंतीवरून कोटा अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंची निर्यात करण्यास भारत सरकारने परवानगी दिली आहे. ही परवानगी २०२४-२५ साठी देण्यात असून उभय देशांमधील दीर्घकालीन मैत्री, द्विपक्षीय व्यापार संबंध वाढवण्याची दृढ वचनबद्धता दर्शवतो’, असेही जमीर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, वाढणाऱ्या महागाईचा दर नियंत्रणावरून केंद्र सरकारने निर्यात बंदीचे धोरण आखले होते. पण शेजारी देश प्रथम’ धोरणांतर्गत भारताने मालदीवमध्ये तांदूळ, साखर आणि कांद्याची निर्यात सुरूच ठेवली आहे. यावरून मालदीवमधील मानव-केंद्रित विकासाला पाठिंबा देण्यासाठी भारत दृढ वचनबद्ध असल्याचे, मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांनी दिलेल्या निवेदनात गुरुवारी (ता.०४) म्हटले आहे. तर मालदीवमधील झपाट्याने वाढणाऱ्या बांधकाम उद्योगासाठी नदीतील वाळू आणि दगडाचा कोटा २५ टक्क्यांनी वाढवून तो १० लाख मेट्रिक टन करण्यात आला आहे. तसेच विदेश व्यापार महासंचालनालय (DGFT) अधिसूचनेनुसार अंडी, बटाटे, कांदा, साखर, तांदूळ, गव्हाचे पीठ आणि डाळ (डाळी) यांच्या कोट्यातही ५% वाढ करण्यात आली आहे.

देशांतर्गत महागाईवर नियंत्रण ठेवताना केंद्र सरकाने निर्यात बंदीचे धोरण आखले होते. पण मित्र राष्ट्रांमधील अत्यावश्यक वस्तूंची नितांत गरज लक्षात घेऊन निर्यात सुरू ठवण्यात आली.तांदूळ – १,२४,२१८ टन, गहू पीठ – १,०९,१६२ टन, साखार – ६४, ४९४ टन, बटाटे – २१,५१३ टन, कांदा – ३५,४४९ टन, डाळ – २२४.४८ टन आणि अंडी – ४२.७५ कोटी इत्यादी, वस्तूंच्या निर्यातीला २०२४-२५ दरम्यान सध्या किंवा भविष्यात कोणतेही निर्बंध किंवा प्रतिबंधातून मालदिवला सूट दिली जाईल.

SL/ML/SL

6 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *