तिळाच्या वड्या बनवा घरच्या घरी

 तिळाच्या वड्या बनवा घरच्या घरी

तिळाच्या वड्या बनवा घरच्या घरी

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारा वेळ:  २० मिनिटे

लागणारे जिन्नस: 

१. तीळ – अर्धी वाटी
२.शेंगदाण्याचे कूट – पाव वाटी
३.गूळ – पाऊण वाटी बारीक किसून
४.तूप – ४ मोठे चमचे
५.वड्या थापायला २ ताटे

क्रमवार पाककृती: 

१.एका मोठ्या कढईत तीळ कोरडे भाजून घ्यावेत. आच मंद ठेवावी कारण जास्त ठेवल्यास लगेच करपतात. हलका रंग बदलेपर्यंत भाजावेत आणि बाजूला काढून ठेवावेत.
२.दोन ताटांना मागील बाजूस तूप लावून ठेवावे.
३.कढईत तूप टाकावे आणि गूळ टाकावा. गूळ वितळला की आच बंद करावी.
४.लगेच तीळ आणि शेंगदाण्याचे कूट टाकावे. मिश्रण भरभर एकजीव करावे.
५.तूप लावलेल्या ताटांवर पसरावे. मिश्रण गरम असल्याने वाटीच्या तळाला तूप लावून त्याने पसरावे.
६.पसरल्यानंतर लगेच वड्या पाडाव्यात.
७.थंड झाल्यावर वड्या काढून घ्याव्यात

Make sesame seeds at home

PGB/ML/PGB
6 Nov2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *